IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ३९व्या सामन्यात आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात लखनौने चेन्नईचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि टॉप ४ मध्ये आपले स्थान कायम ठेवण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, लखनौचा संघ चेन्नईला हरवून टॉप-४ मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रविवारी (२२ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ३९वा सामना खेळला जाईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, समीर रिझवी, मोईन अली, एमएस धोनी (विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, डॅरिल मिशेल, अरावेली अवनीश, महेश टेकशाना, आरएस हंगरगेकर, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय जाधव मंडल, रिचर्ड ग्लीसन.
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंह चरक, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, काइल मेयर्स, शमर जोसेफ, ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, मयंक यादव.
संबंधित बातम्या