आयपीएल २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज संध्याकाळी ७:३० वाजेपासून या सामन्याला सुरुवात होईल.
यंदाच्या आयपीेलमध्ये दोन्ही संघांनी धमाकेदार सुरुवात केली होती. पण चेन्नई सुपर किंग्सने मागील सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे ते आजच्या सामन्यातून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.
यासोबतच कोलकाता नाईट रायडर्स या मोसमात तुफानी फॉर्मात दिसत आहे. त्यांनी सलग तीन सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.
आयपीएलच्या १७व्या मोसमात चेन्नई आणि कोलकाता आज पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. आयपीएलमध्ये (CSK vs KKR Head To Head Record) कोलकाताविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १८ सामने जिंकले आहेत तर कोलकाताने १० सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. अर्धातास आधी नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
चेपॉकच्या मैदानावर गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये जबरदस्त स्पर्धा होऊ शकते. येथे नेहमीच फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. पण संध्याकाळनंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होते.
तर दुसरीकडे, नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांनाही खूप मदत मिळते. मात्र, या मोसमात आतापर्यंत या मैदानावर २ सामने खेळले गेले आहेत. जिथे खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल दिसत आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला आवडेल.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे ७८ सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४७ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना संघांनी ३१ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६३ आहे. मात्र या मोसमात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त धावा झाल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरेल मिशेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.
कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
संबंधित बातम्या