CSK vs KKR Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा २२ वा सामना आज (८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून खेळला जाईल.
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. केकेआरने आतापर्यंत तीन सामने खेळले असून हे तिन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यातील दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभव झाला आहे. सध्या IPL २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये CSK तिसऱ्या स्थानावर आणि KKR दुसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, केकेआर असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक: फिलिप सॉल्ट
फलंदाज: रचिन रवींद्र, शिवम दुबे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर
अष्टपैलू: सुनील नरेन (उपकर्णधार), आंद्रे रसेल, मोईन अली
गोलंदाज : तुषार देशपांडे, हर्षित राणा
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फिरकीपटूंसाठी फायदेशीर असते. मात्र, येथे झालेल्या गेल्या दोन आयपीएल सामन्यांमध्ये फलंदाजांचा वरचष्मा होता. या मोसमात फिरकी गोलंदाजांचे आकडे खराब आहेत. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला आवडेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डनुसार (CSK vs KKR Head To Head Record) आतापर्यंत दोन्ही संघ ३० वेळा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नईने १९ सामने जिंकले आहेत. याशिवाय कोलकाताने ११ सामने जिंकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरेल मिशेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.
कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.