CSK vs GT: गुजरातचा ६३ धावांनी पराभव
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs GT: गुजरातचा ६३ धावांनी पराभव

CSK vs GT: गुजरातचा ६३ धावांनी पराभव

Mar 27, 2024 12:13 AM IST

Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Score: चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल २०२४ चा सातवा सामना खेळला जात आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.

चेन्नई- गुजरात यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
चेन्नई- गुजरात यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
  • आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ६३ धावांनी पराभव केला आहे.
  • आठ षटकांनंतर गुजरातने तीन विकेट्स गमावून ५७ धावा केल्या आहेत. सध्या साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत. आठव्या षटकात डॅरिल मिशेलने विजय शंकरला यष्टिरक्षक धोनीकडे झेलबाद केले. धोनीने डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला.
  • चेन्नई सुपर किंग्जला तेराव्या षटकात १२७ धावांवर तिसरा धक्का बसला. स्पेन्सर जॉन्सनने कर्णधार रुतुराज गायकवाडला झेलबाद केले. ऋतुराजचे अवघ्या चार धावांसाठी अर्धशतक हुकले. त्याने ३६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या.
  • अजिंक्य रहाणेच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणे १२ बॉलमध्ये १२ धावा करून माघारी परतला
  • चेन्नईची चांगली सुरुवात

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि सलामीवीर रचिन रवींद्र यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.

  • चेन्नईची प्लेईंग इलेव्हन:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान

  • गुजरातची प्लेईंग इलेव्हन:

वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

  • आयपीएलच्या सतराव्या हंगामात दोन युवा कर्णधार आज एकमेकांशी भिडणार आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर येतील. या हंगामात युवा ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या संघाचे नेत्तृत्व करीत आहे. तर, सलामीवीर शुभमन गिलवर गुजरातच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही कर्णधार कशापद्धतीने आपपल्या संघाचे नेत्तृत्व करतील. हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग