IPL 2024: चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. महेश तीक्ष्णाच्या जागी मथिशा पाथीरानाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. हा सामना चेन्नईचे होमग्राऊंड असलेले चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. अशा स्थितीत विजयाची घोडदौड कायम ठेवण्याकडे चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांच्या नजरा असतील. गेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला होता. तर, गुजरातने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स आतापर्यंत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील तीन सामन्यात गुजरातच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, चेन्नईच्या संघाला दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. आकडेवारी पाहता गुजरातच्या संघाचे पारडं जड दिसत आहे.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रेहमान.
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.
संबंधित बातम्या