IPL 2024: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडलेले दोन्ही संघ यंदाच्या हंगामात पहिल्यांच एकमेकांसमोर येत आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि गुजरातचे नेतृत्व दोन युवा खेळाडू करणार आहेत. एकीकडे, महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी राजीनामा दिल्याने ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृ्त्व करीत आहे. दुसरीकडे, गुजरातचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या आपली जुनी फ्रँचायझी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्याने शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी आपपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईने त्यांच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. त्यानंतर गुजरातने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ६ धावांनी पराभवाची धुळ चारली. यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधात मैदानात उतरतील.
आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात चेन्नई आणि गुजरात एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना २६ मार्च २०२४ रोजी होणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होईल. आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.
स्टार स्पोर्ट्स १ एचडी वर इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री उपलब्ध असेल. तर, हिंदी भाषेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्स हिंदी एचडी हा पर्याय आहे. याशिवाय, बंगाली, कन्नड, तेलगू आणि तामिळसह इतर भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे. भारतातील जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. हा सामना जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे. या ॲपमध्ये थेट सामने पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनमध्ये Jio Cinema ॲप इन्स्टॉल करून आयपीएलचा सामना मोफत पाहू शकता. याशिवाय तुम्ही marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
संबंधित बातम्या