मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs GT Head To Head: चेन्नई- गुजरात यांच्यात कोण मारणार बाजी? सामन्यापूर्वी पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

CSK vs GT Head To Head: चेन्नई- गुजरात यांच्यात कोण मारणार बाजी? सामन्यापूर्वी पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 26, 2024 10:45 AM IST

Chennai Super Kings vs Gujarat Titans Head To Head Record: चेन्नई आणि गुजरात यांच्यात आयपीएल २०२४ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे.

चेन्नई आणि गुजरात यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.
चेन्नई आणि गुजरात यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामात दोन युवा कर्णधार आज एकमेकांशी भिडणार आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर येतील. या हंगामात युवा ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या संघाचे नेत्तृत्व करीत आहे. तर, सलामीवीर शुभमन गिलवर गुजरातच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही कर्णधार कशापद्धतीने आपपल्या संघाचे नेत्तृत्व करतील. हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स आतापर्यंत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील तीन सामन्यात गुजरातच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, चेन्नईच्या संघाला दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. आकडेवारी पाहता गुजरातच्या संघाचे पारडं जड दिसत आहे. परंतु, चेन्नईविरुद्ध जिंकलेल्या तिन्ही सामन्यात हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार होता, ज्याने पदार्पणाच्या हंगामातच संघाला ट्रॉफी जिंकून दिली. शुभमन गिलच्या नेत्तृत्वात गुजरातचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामना चेपॉक येथे खेळवला जाणार आहे. हा सामना होमग्राऊंडमध्ये खेळवला जात असल्याने चेन्नईच्या संघाला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सने गेल्या वर्षी चेन्नईत सीएसकेकडून क्वालिफायर सामना मोठ्या फरकाने गमावला होता. आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी गुजरातला जबरदस्त फॉर्म दाखवण्याची गरज आहे. आजचा सामना चेन्नई जिंकण्याची शक्यता जास्त आहे.

RCB vs PBKS : महिपाल लोमरोरचा इम्पॅक्ट आणि कार्तिकचा फिनीशिंग टच... आरसीबीचा पहिला विजय

 

चेन्नई सुपर किंग्स संघ:

ऋतुराज गायकवाड़ (कप्तान), एमएस धोनी (विकेटकीपर), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जड़ेजा, समीर रिजवी, दीपक चाहर, महेश थीक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकुर, शेख रशीद, मोईन अली, निशांत सिंधू, मिशेल सँटनर, अजय जादव मंडल, प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंह, आरएस हंगारगेकर, अरवेल्ली अवनीश.

गुजरात टायटन्स संघ:

वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा, शरथ मनहर, अब्दुल्ला, अब्राहम , नूर अहमद, मानव सुथार, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, शाहरुख खान, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, जयंत यादव.

IPL_Entry_Point