मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs CSK : धोनीची तुफानी फलंदाजी, पण सीएसकेचा पराभव, दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला

DC vs CSK : धोनीची तुफानी फलंदाजी, पण सीएसकेचा पराभव, दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 31, 2024 06:46 PM IST

csk vs dc live score, ipl 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने यंदाचा पहिला विजय मिळवला.

chennai super kings vs delhi capitals scorecard
chennai super kings vs delhi capitals scorecard (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना विखापट्टणम येथे खळला गेला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने १६ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची तुफानी खेळी केली. 

यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ३ षटकार आले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. तर चेन्नईचा हा पहिला पराभव आहे.

या सामन्यात दिल्लीने सीएसकेला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य दिले होते, याच्या प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ ६ गडी गमावून केवळ १७१ धावाच करू शकला आणि सामना गमावला. 

संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४५ धावांची आणि डॅरेल मिशेलने ३४ धावांची खेळी खेळली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या मोसमात पहिल्यांदा फलंदाजीला आला, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

धोनीने या सामन्यात आपले कौशल्य नक्कीच दाखवले आणि ३ षटकार मारले. मात्र १६ चेंडूत ३७ धावा करून तो नाबाद राहिला. दिल्ली संघाकडून मुकेश कुमारने ३ बळी घेतले. तर खलील अहमदने २ आणि अक्षर पटेलने १ बळी घेतला.

दिल्ली वि. चेन्नई लाईव्ह क्रिकेट स्कोअर

सीएसकेला सहावा धक्का

१२० धावांवर चेन्नईला सहावा धक्का बसला. मुकेश कुमारने शिवम दुबेला शिकार बनवले. त्याला केवळ २० धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

डॅरिल मिशेल बाद

चेन्नईला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डेरिल मिशेलला अक्षर पटेलने बाद केले. मिशेलने अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. त्याला ३४ धावा करण्यात यश आले. शिवम दुबे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. ११ षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या ३ बाद ७८ आहे.

रचिन रविंद्र बाद

खलील अहमद चेन्नईविरुद्ध घातक गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याने डावाच्या तिसऱ्या षटकात रचिन रवींद्रलाही बाद केले. यापूर्वी खलीलने कर्णधार ऋतुराज गायकवाडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. आता डॅरिल मिचेल आणि अजिंक्य रहाणे क्रीजवर आहेत.

सीएसकेला पहिला धक्का

चेन्नई सुपर किंग्जची पहिली विकेट अवघ्या तीन धावांवर पडली. खलील अहमदने CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडला पंतकरवी झेलबाद केले. त्याला एकच धाव करता आली. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. एका षटकानंतर सीएसकेची धावसंख्या ३/१ आहे.

दिल्लीच्या १९१ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ५ गडी गमावून १९१ धावा केल्या. संघासाठी डेव्हिड वॉर्नरने ३५ चेंडूत ५२ धावांची तर कर्णधार ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. कार अपघातानंतर ऋषभ पंतचे हे पहिलेच अर्धशतक आहे.

या व्यतिरिक्त या मोसमात पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉने ४३ धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, चेन्नई संघाकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने ३ बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.

मिचेल मार्श बाद

मथिशा पाथिरानाने चेन्नई सुपर किंग्जला तिसरा विकेट मिळवून दिला. त्याने ताशी १५०  किमी वेगाने गोलंदाजी केली आणि मिशेल मार्शला त्रिफळा उडवला. दिल्लीला १३४ धावांवर तिसरा धक्का बसला. या सामन्यात मार्शला केवळ १८ धावा करता आल्या.

डेव्हिड वॉर्नर बाद

दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विकेट १० व्या षटकात ९३ धावांवर पडली. मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर पाथीरानाने वॉर्नरचा अप्रतिम झेल घेतला. आता ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक

९ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या बिनबाद ९१ धावा. डेव्हिड वॉर्नर ३३ चेंडूत ५१ धावांवर खेळत आहे. त्याने आतापर्यंत ५ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. तर पृथ्वी शॉ २२ चेंडूत ३४ धावांवर खेळत आहे.

दिल्लीची वेगवान सुरुवात

दिल्लीच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. वॉर्नर आणि शॉने बिनबाद ६ षटकात ६३ धावा केल्या आहेत. शॉ ३० आणि वॉर्नर ३० धावांवर खेळत आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.

दिल्लीची प्रथम फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ दोन बदलांसह दाखल झाला आहे. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर या सामन्यात चेन्नई कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.

दिल्ली-सीएसके हेड टू हेड

सीएसकेविरुद्ध दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नाही. उभय संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १९ वेळा सीएसकेने विजय मिळवला आहे, तर दिल्लीने १० सामन्यांत विजयाची चव चाखली आहे.

तर दोन्ही संघांमध्ये गेल्या ४ सामन्यातील सर्वच सामने सीएसकेने जिंकले आहेत. आणि हे चारही सामने गमावले आहेत.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

WhatsApp channel