CSK IPL Auction : सीएसकेने तयार केली चॅम्पियन टीम, आता अशी असू शकते त्यांची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK IPL Auction : सीएसकेने तयार केली चॅम्पियन टीम, आता अशी असू शकते त्यांची प्लेइंग इलेव्हन

CSK IPL Auction : सीएसकेने तयार केली चॅम्पियन टीम, आता अशी असू शकते त्यांची प्लेइंग इलेव्हन

Nov 26, 2024 03:14 PM IST

Chennai Super Kings In IPL Auction : जुन्या खेळाडूंना खरेदी करण्याची चेन्नई सुपर किंग्जची रणनीती प्रभावी ठरली आहे. रविचंद्रन अश्विन १० वर्षांनंतर चेन्नई संघात पुनरागमन करणार आहे.

CSK IPL Auction : सीएसकेने तयार केली चॅम्पियन टीम, आता अशी असू शकते त्यांची प्लेइंग इलेव्हन
CSK IPL Auction : सीएसकेने तयार केली चॅम्पियन टीम, आता अशी असू शकते त्यांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केलेले महत्वाचे खेळाडू पुन्हा खरेदी केले आहेत. सीएसकेने रविचंद्रन अश्विन, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे आणि सॅम करन यांना विकत घेतले आहे.

यानंतर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात संघाची प्लेइंग इलेव्हन असेल, याचा विचार चाहते करत आहेत.

सीएसकेचे प्लेइंग इलेव्हन असे असू शकते

आयपीएल २०२३ मध्ये ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या ओपनिंग जोडीने विरोधी गोलंदाजांना चांगलेच धुतले होते. IPL २०२३ मध्ये गायकवाड आणि कॉनवे यांनी अनुक्रमे ५९० आणि ६७२ धावा केल्या. आता हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये सीएसकेसाठी सलामीला खेळताना दिसू  शकतात. 

जागतिक क्रिकेटमध्ये रचिन रवींद्रचा दर्जा वाढला असून गेल्या वर्षीही त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० सामन्यांत २२२ धावा केल्या होत्या.

यावेळी सीएसकेने राहुल त्रिपाठीला ३.४० कोटींना खरेदी करून मोठा विश्वास दाखवला आहे. त्रिपाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसतो. येथे रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत येतात, ज्यांना CSK ने अनुक्रमे १८ कोटी आणि १२ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.

यानंतर रविचंद्रन अश्विन १० वर्षांनंतर या संघात पुनरागमन करत असल्याने चेन्नईचा संघही मजबूत झाला आहे. दरम्यान, एमएस धोनी देखील आहे, ज्याने मागील हंगामात २२० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

अश्विननंतर संघाचा दुसरा प्रमुख फिरकी गोलंदाज अफगाणिस्तानचा नूर अहमद असू शकतो, ज्याला चेन्नईने १० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. खलील अहमद आणि मथिशा पाथिराना वेगवान गोलंदाजी सांभाळू शकतात. वेगवान गोलंदाजीत सीएसकेकडे कमलेश नागरकोटी, अंशुल कंबोज आणि नॅथन एलिस यांच्यासह अनेक चांगले पर्याय असतील.

IPL 2025 साठी CSK ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, रविचंद्रन अश्विन, मथिशा पाथिराना, खलील अहमद, नूर अहमद.

Whats_app_banner