IPL Auction : सीएसकेच्या रडारवर वेगवान गोलंदाज आणि ऑलराउंडर्स; लिलावासाठी असा आहे मास्टर प्लॅन-csk in ipl auction 2024 chennai super kings have to target fast bowlers and all rounder in ipl 2024 auction csk strategy ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Auction : सीएसकेच्या रडारवर वेगवान गोलंदाज आणि ऑलराउंडर्स; लिलावासाठी असा आहे मास्टर प्लॅन

IPL Auction : सीएसकेच्या रडारवर वेगवान गोलंदाज आणि ऑलराउंडर्स; लिलावासाठी असा आहे मास्टर प्लॅन

Dec 18, 2023 12:48 PM IST

CSK In IPL Auction 2024 : आयपीएल लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्जकडे फक्त ६ स्लॉट रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी चेन्नई फ्रँचायझीकडे ३१.४ कोटी रुपयांची मोठी रक्कम शिल्लक आहे.

CSK In IPL Auction
CSK In IPL Auction

CSK Auction Strategy : आयपीएलच्या (ipl 2024) आगामी मोसमासाठी मंगळवारी (१९ डिसेंबर) खेळाडूंचे मिनी ऑक्शन होणार आहे. या मिनी लिलावासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. आयपीएलचे मिनी ऑक्शन दुबईत मंगळवारी दुपारी १ वाजता सुरू होईल. 

आयपीएल लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्जकडे फक्त ६ स्लॉट रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी चेन्नई फ्रँचायझीकडे ३१.४ कोटी रुपयांची मोठी रक्कम शिल्लक आहे. म्हणजेच या फ्रँचायझीकडे प्रति स्लॉट ५ कोटींपेक्षा जास्त पैसे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत CSK फ्रेंचायझी या लिलावात मोठी बोली लावण्यासाठी सज्ज आहे.

या IPL लिलावात चेन्नई फ्रँचायझीचे सर्वाधिक लक्ष चांगल्या वेगवान गोलंदाजांवर असेल. वास्तविक, सीएसकेला आपल्या संघात तज्ज्ञ वेगवान गोलंदाजांची कमतरता भासत आहे. चेन्नई मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड किंवा ख्रिस वोक्स सारख्या दर्जेदार गोलंदाजांवर मोठी बोली लावू शकते.

 अष्टपैलू खेळाडूंवरही नजर असेल

वेगवान गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंवरही सीएसके फ्रेंचायझी नजर ठेवणार आहे. गेल्या वेळी या संघाने बेन स्टोक्ससारख्या दिग्गज वेगवान अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते, परंतु स्टोक्सच्या माघारीनंतर चेन्नईकडे या विभागात एक जागा रिक्त आहे. येथे शार्दुल ठाकूर हा चेन्नईसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

एक-दोन मोठे फलंदाज हवेत

चेन्नईची फलंदाजी चांगली असली तरी त्यात आणखी एक-दोन विशेषज्ञ फलंदाज जोडले गेले तर हा संघ खूप शक्तिशाली होऊ शकतो. चेन्नईच्या पर्समध्येही चांगली रक्कम आहे. अशा परिस्थितीत हा संघ एक किंवा दोन मोठ्या फलंदाजांना आपल्या संघाचा भाग बनवू शकतो.

येथे ट्रॅव्हिस हेड आणि रचिन रवींद्रसारखे परदेशी खेळाडू चेन्नईचे टार्गेट ठरू शकतात. चेन्नईकडे स्पिन बॉलिंगमध्ये आधीच मोठी नावे आहेत. अशा परिस्थितीत, ही फ्रेंचायझी स्पिनर्सच्या मागे जाणार नाही.

चेन्नईचा सध्याचा संघ : अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिष थीक्शना , मथिशा पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजित सिंग, तुषार देशपांडे.

Whats_app_banner