मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ram Mandir : श्री रामाच्या प्रतिष्ठापणेसाठी हे स्टार क्रिकेटर्स आयोध्येत पोहोचले, व्हिडीओ पाहा

Ram Mandir : श्री रामाच्या प्रतिष्ठापणेसाठी हे स्टार क्रिकेटर्स आयोध्येत पोहोचले, व्हिडीओ पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 21, 2024 08:37 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोमवारी (२२ जानेवारी) दुपारी १२.२० वाजता सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच देशभरातून रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत.

Cricketers in Ram Mandir ayodhya
Cricketers in Ram Mandir ayodhya (Photo – X)

Cricketers in Ram Mandir Pran Pratishtha in Ayodhya : सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. उद्या (२२ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत.

श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोमवारी दुपारी १२.२० वाजता सुरू होईल. मात्र त्यापूर्वीच देशभरातून रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक क्रिकेटर्सही अयोध्येला पोहोचले आहेत.

तर बाकीचे क्रिकेटपटू अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहेत. ते उद्या सकाळपर्यंत आयोध्येत पोहोचतील. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद अयोध्येला पोहोचला आहे. प्रसाद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. व्यंकटेश प्रसाद अयोध्येत फिरताना दिसत आहेत.

कुंबळे लखनौला पोहोचला

तर दुसरीकडे भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेही अयोध्येला पोहोचण्याच्या तयारीत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लखनऊमध्ये असल्याचे दिसत आहे.

कुंबळेला चाहत्यांनी घेरल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत कुंबळेला चाहत्यांमधून बाहेर काढून कारमध्ये बसवण्यात आले. दुसरीकडे व्यंकटेश प्रसाद यांनी अयोध्येतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जय श्री राम एक अद्भूत क्षण. असे लिहिले आहे.

या खेळाडूंनाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

दरम्यान, श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनाही बोलावणे आले आहे. तर त्याआधी कर्णधार रोहित शर्मा, माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, कपिल देव, हरभजन सिंग, गौतम गंभीर, मिताली राज, हरमनप्रीत कौर यांनाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.

WhatsApp channel