टीम इंडियाचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर मैदानावरील त्याच्या चमकदार खेळासाठी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, परंतु अलीकडेच त्याने त्याच्या खेळापेक्षा काहीतरी वेगळे केले आहे, यामुळे त्याने इंटरनेटवरील कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत.
श्रेयसने मुंबईच्या रस्त्यावर एका गरीब महिला विक्रेत्याला मदत केली. आता त्याच्या या औदार्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
अनेक महान क्रिकेटपटूंचे जन्मस्थान असलेले मुंबई शहर श्रेयस अय्यरचेही घर आहे. अय्यर वांद्रे येथील एका पॉश भागात असलेल्या सलूनमधून बाहेर येताना दिसला. तो बाहेर येताच पापाराझी आणि काही चाहत्यांनी त्याला फोटो आणि ऑटोग्राफसाठी घेराव घातला. एका चाहत्याने अय्यरला बॅट आणि त्याच्यासोबत आणलेल्या जर्सीवर ऑटोग्राफ मागितला, जो त्याने आनंदाने दिला. पण यानंतर जे घडले ते सर्वांसाठी खूप खास होते.
सलूनमधून बाहेर येताच काही वस्तू विकणाऱ्या एका गरीब महिलेने श्रेयसला मदत मागायला सुरुवात केली. ती महिला अय्यर यांच्याकडे गेली आणि त्याच्याशी बोलू लागली आणि नंतर ती गाडीपर्यंत त्याच्या मागे गेली.
यादरम्यान श्रेयसने प्रथम महिलेला धीर धरण्यास सांगितले आणि तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला. यानंतर त्याने महिलेला काही पैसे दिले. श्रेयस अय्यरच्या या छोट्याशा कृतीने महिला खूप आनंदी झाली. तसेच, कोट्यवधी चाहत्यांचीही श्रेयस अय्यरने मनं जिंकली.
श्रेयसने महिलेला मदत केल्यावर महिलेच्या आनंदाला पारावार उरला नाही. शेवटी अय्यरने महिलेसोबत हस्तांदोलन केले. हा खूप गोड क्षण होता.
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर श्रेयस अय्यर भारतीय संघाचा भाग होता. मात्र, एकदिवसीय मालिकेत त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये भारत डी संघाचे नेतृत्व करेल. यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२४ चे विजेतेपद मिळवून दिले होते.