Pravin Amare : क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना महसूल विभागाचा दणका, बेकायदा बांधकाम प्रकरणी लाखोंचा दंड
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pravin Amare : क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना महसूल विभागाचा दणका, बेकायदा बांधकाम प्रकरणी लाखोंचा दंड

Pravin Amare : क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना महसूल विभागाचा दणका, बेकायदा बांधकाम प्रकरणी लाखोंचा दंड

Published Aug 23, 2024 10:48 AM IST

माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना महसूल विभागाने दंड ठोठावला आहे. अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याचा ठपका महसुल विभागाने आमरे यांच्यावर ठेवला आहे.

Pravin Amare : क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना महसूल विभागाचा दणका, अनधिकृत बांधकामप्रकरणी लाखोंचा दंड
Pravin Amare : क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना महसूल विभागाचा दणका, अनधिकृत बांधकामप्रकरणी लाखोंचा दंड

माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना महसूल विभागाने दंड ठोठावला आहे. अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याचा ठपका महसुल विभागाने आमरे यांच्यावर ठेवला आहे. माहिती अधिकाराखाली माहिती विचारल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनधिकृत बांधकाम

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमधील ग्रामपंचायत रीळ हद्दीत समुद्र किनाऱ्याजवळ प्रवीण आमरे यांचे बांधकाम सुरु आहे. आता हेच बांधकाम वादाच्या भोवऱ्यात आले आहे. सुरू असलेले बांधकाम हे अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात येत होता. 

हे बांधकाम सुरू करण्यापूर्वी रत्नागिरी तहसील कार्यालय, महाराष्ट्र सागरी मंडळ यांची कोणतीही परवानगी त्यासाठी घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत रीळ हद्दीतील हे बांधकाम गट क्रमांक ६४४ क्षेत्रात समुद्राच्या बाजूला आहे. त्यासाठी खारफुटी कांदळवन तोडून समुद्राच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. ७/१२ नुसार हे बांधकाम ४३० चौरस मीटर आहे. पण प्रत्यक्षात बांधकाम एकूण ६८१.७२ चौरस मीटरवर झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 

यानंतर आता या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ आणि ४५ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली. तर कलम ४८(७) अन्वये दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली. 

त्यानुसार, अनधिकृत वाळू उत्खननाबाबत १२ लाख ५० हजार रुपये आणि रॉयल्टी पोटी १५,००० रुपये असा एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस महसूल विभागाने आमरे यांना बजावली आहे. 

प्रविण आमरे यांची क्रिकेट कारकिर्द

प्रवीण आमरे यांनी १९९१ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ११ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामने खेळले आणि संघात फलंदाज आणि अष्टपैलूची भूमिका बजावली. आमरे यांनी १९९२-९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे १०३ धावांची खेळी खेळून परदेशी भूमीवर पदार्पणातच शतक झळकावले होते. 

मुंबई, राजस्थान, बंगाल आणि रेल्वे अशा विविध देशांतर्गत संघांसाठी खेळण्याबरोबरच ते दक्षिण आफ्रिकेतील बोलंड संघाकडूनही खेळले. प्रवीण आमरे यांना रमाकांत आचरेकर यांनी प्रशिक्षण दिले होते, आचरेकर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीसारख्या खेळाडूंचेही प्रशिक्षक होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या