Cricket Commentator Fees : क्रिकेट कॉमेंटेटर कोट्यवधी रूपये कमावतात? प्रति सामना किती पैसे मिळतात? आकाश चोप्राचा खुलासा-cricket commentator earning 6 to 10 lakhs per day as per match fee aakash chopra revealed ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cricket Commentator Fees : क्रिकेट कॉमेंटेटर कोट्यवधी रूपये कमावतात? प्रति सामना किती पैसे मिळतात? आकाश चोप्राचा खुलासा

Cricket Commentator Fees : क्रिकेट कॉमेंटेटर कोट्यवधी रूपये कमावतात? प्रति सामना किती पैसे मिळतात? आकाश चोप्राचा खुलासा

Sep 16, 2024 11:23 AM IST

Cricket Commentator Fees : क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अनेकजण कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतात. सोबतच, असेही काही समालोचक आहेत, जे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित नाहीत, म्हणजेच ते व्यावसायिक क्रिकेट खेळलेले नाहीत. तरी ते अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाचे विश्लेषण करतात.

Cricket Commentator Fees : क्रिकेट कॉमेंटेटर कोट्यवधी रूपये कमावतात? प्रति सामना किती पैसे मिळतात? आकाश चोप्राचा खुलासा
Cricket Commentator Fees : क्रिकेट कॉमेंटेटर कोट्यवधी रूपये कमावतात? प्रति सामना किती पैसे मिळतात? आकाश चोप्राचा खुलासा

भारतात क्रिकेटपटूंना प्रचंड पैसा मिळतो. क्रिकेटपटूंसोबतच या खेळाच्या विविध माध्यमातूनही चांगला पैसा कमावता येतो. यात कॉमेंट्रीचाही समावेश आहे. कॉमेंट्रीमुळे सामना अधिक रोमहर्षक बनतो. क्रिकेट जगतात असे अनेक कॉमेंटेटर आहेत, ज्यांच्या आवाजने अंगावर शहारे येतात आणि सामन्यातील प्रसंग अधिक रोमांचक बनतो. 

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अनेकजण कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतात. सोबतच, असेही काही समालोचक आहेत, जे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित नाहीत, म्हणजेच ते व्यावसायिक क्रिकेट खेळलेले नाहीत. तरी ते अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाचे विश्लेषण करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का, की क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या व्यक्तीला किती मानधन मिळते?

सध्या प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याची एक मुलाखत प्रचंड चर्चेत आहे. राज शामानी याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने कॉमेंटेटर्सना मिळणाऱ्या मानधनाबाबत सांगितले आहे.

शोमध्ये आकाश चोप्राला विचारण्यात आले की एक समालोचक किती पैसे कमवू शकतो? यावर उत्तर देताना आकाश चोप्राने सांगितले की, सामन्यत: कॉमेंटेटरला प्रत्येक सामन्यासाठी म्हणजेच, मॅच फी दिली जाते, ज्यामध्ये रोजची कमाई ६ ते १० लाख रुपये असू शकते. 

या अर्थाने, जर एखाद्या समालोचकाने वर्षातून १०० दिवस समालोचन केले तर त्याला वर्षभरात १० कोटी रुपये मिळू शकतात.

असे अनेकदा घडते की एखाद्या ऐतिहासिक सामन्याची कॉमेंट्री चाहत्यांच्या मनात घर करून जाते. उदाहरणार्थ रवी शास्त्री यांची २०११ च्या वर्ल्डकप फायनलमधील कॉमेंट्री चाहत्यांच्या मनात आजही ताजी आहे.

यानंतर हर्षल भोगले यांची २०२२ टी वर्ल्डकपमधील कॉमेंट्रीही चाहत्यांना आवडली, जेव्हा विराटने हारिस रौफच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले होते.

विशेष म्हणजे जेव्हा टीव्ही इतका लोकप्रिय नव्हता तेव्हा लोक फक्त रेडिओवर कॉमेंट्री ऐकूनच सामन्यांचा आनंद लुटत असत. आता लोकांना मॅच पाहण्यासोबत कॉमेंट्रीचा आनंद घ्यायला आवडतो.

Whats_app_banner
विभाग