IND vs AUS : ऑस्ट्रेलियात 'मंकीगेट'ची पुनरावृत्ती, महिला कॉमेंटेटर बुमराहबाबत हे काय बोलून बसली! पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS : ऑस्ट्रेलियात 'मंकीगेट'ची पुनरावृत्ती, महिला कॉमेंटेटर बुमराहबाबत हे काय बोलून बसली! पाहा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात 'मंकीगेट'ची पुनरावृत्ती, महिला कॉमेंटेटर बुमराहबाबत हे काय बोलून बसली! पाहा

Dec 16, 2024 08:46 AM IST

Jasprit Bumrah Primate Isa Guha : इंग्लिश समालोचक इसा गुहा हिने आता तिच्या 'प्राइमेट' टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. जसप्रीत बुमराहचा आदर करणे हेच त्याचे उद्दिष्ट असल्याचे तिने म्हटले आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात 'मंकीगेट'ची पुनरावृत्ती, महिला कॉमेंटेटर बुमराहबाबत हे काय बोलून बसली! पाहा
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात 'मंकीगेट'ची पुनरावृत्ती, महिला कॉमेंटेटर बुमराहबाबत हे काय बोलून बसली! पाहा

Jasprit Bumrah Primate : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावरील वांशिक वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. बुमराह सध्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ६ बळी घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १२व्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पण अशातच आता एका प्रसिद्ध महिला समालोचकाने बुमराहसाठी 'प्राइमेट' हा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ ' मोठ्या बुद्धीचा माकड' असा होतो.

या वर्णभेदी कमेंटमुळे आता 'मंकी गेट स्कँडल' पुन्हा चर्चेत आले आहे. हे प्रकरण हरभज सिंग आणि अँण्ड्रू सायमंड्स यांच्यात झाला होते.

बुमराहने ब्रिस्बेन कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २ विकेट घेतल्या होत्या, तेव्हा कॉमेंट्री करताना ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट ली याने त्याचे खूप कौतुक केले होते. त्यानंतर इंग्लिश समालोचक इसा गुहा हिने वादग्रस्त कमेंट केली, ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

ती म्हणाली, "बुमराह हा संघाचा एमव्हीपी आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट जसप्रीत बुमराह. तो भारतासाठी सर्वात प्रभावी ठरला आहे. या कसोटी सामन्यासाठी त्याच्यावर इतका फोकस का आहे?"

ईसा गुहाने माफी मागितली

इंग्लिश समालोचक इसा गुहा हिने आता तिच्या 'प्राइमेट' टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. जसप्रीत बुमराहचा आदर करणे हेच त्याचे उद्दिष्ट असल्याचे तिने म्हटले आहे.

माफी मागताना ती म्हणाली, "मी काल माझ्या कॉमेंट्री दरम्यान एक शब्द वापरला होता, ज्याचे हजारो अर्थ असू शकतात. माझ्या कमेंटमुळे दुखावलेल्या सर्वांची मला माफी मागायची आहे. मी इतरांचा खूप आदर करते."

'प्राइमेट' या शब्दाचा अर्थ मोठा मेंदू असलेला मनुष्य असा होतो. पण ते वादाचे कारण बनले आहे.

कारण 'वानर किंवा माकड'च्या उल्लेखाने २००८ मध्ये झालेल्या 'मंकीगेट स्कँडल' पुन्हा चर्चेत आले. वास्तविक, २००८ मध्ये सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात होता. त्यावेळी भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगवर अँड्र्यू सायमंड्सला 'माकड' संबोधल्याचा आरोप झाला होता.

यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरभजन सिंगला तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान आता, इसा गुहाला 'प्राइमेट' म्हणताच लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. इसा असे काही बोलू शकते यावर काही लोकांचा विश्वास बसला नाही आणि काही लोकांनी तर अशा कमेंट्समुळे तिची कारकीर्द संपुष्टात येईल असा दावाही केला.

Whats_app_banner