Sachin-Chris Martin : सचिन, सारा आणि कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन एकत्र, या शानदार सोहळ्यात आणली रंगत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sachin-Chris Martin : सचिन, सारा आणि कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन एकत्र, या शानदार सोहळ्यात आणली रंगत

Sachin-Chris Martin : सचिन, सारा आणि कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन एकत्र, या शानदार सोहळ्यात आणली रंगत

Jan 23, 2025 04:16 PM IST

Sachin Tendulkar Chris Martin : भारतातील संगीतप्रेमींमध्ये कोल्डप्लेच्या टीमची प्रचंड क्रेझ आहे. अलीकडेच कोल्डप्ले गायक ख्रिस मार्टिन याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची भेट घेतली.

सचिन, सारा आणि कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन एकत्र, या शानदार सोहळ्यात आणली रंगत
सचिन, सारा आणि कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिन एकत्र, या शानदार सोहळ्यात आणली रंगत

Coldplay Singer Chris Martin Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने (STF) आपल्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. या खास प्रसंगी कोल्डप्ले या प्रसिद्ध बँडचा गायक ख्रिस मार्टिन हाही सहभागी झाला आणि सचिन तेंडुलकर याच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचा फोटो सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. जो आता चांगलाच व्हायरल होत आहे.

सचिन आणि ख्रिस मार्टिनचा फोटो व्हायरल

या कार्यक्रमादरम्यान, सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनी ख्रिस मार्टिनसोबतचा फोटो क्लीक केले. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फाऊंडेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटने सचिन तेंडुलकरला टॅग करत फोटो शेअर केला आणि लिहिले, की 'आमच्या ५ वर्षांच्या प्रवासात क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सुलभ करण्यासाठी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. सर्व हितचिंतकांचे आणि विशेषत: ख्रिस मार्टिनचे आभार, ज्यांनी हा विशेष प्रसंग आणखी संस्मरणीय बनवला."

सारा तेंडुलकरची नवी सुरुवात

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसाठी हा कार्यक्रम खूपच खास होता. अलीकडेच साराने या फाउंडेशनची संचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि ही तिची पहिलीच अधिकृत उपस्थिती होती.

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी सुरू केलेली ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून वंचितांसाठी चांगले जीवन सुनिश्चित करण्यासाठी काम करते. या कार्यक्रमाची थीम “शाइन ब्राइटर टुगेदर”, अशी होती, जी संस्थेच्या मूळ उद्दिष्टावर केंद्रित आहे.

भारतातील कोल्डप्ले कॉन्सर्टचे वेळापत्रक

ख्रिस मार्टिन आणि त्याची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. या बँडने १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर शो सादर केला. आता ख्रिस मार्टिन आणि त्याचा बँड २५ आणि २६ जानेवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जलवा दाखवणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या