Cricket viral Video : संधी असूनही गोलंदाजानं धावबाद केलं नाही! मनं जिंकणारा व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cricket viral Video : संधी असूनही गोलंदाजानं धावबाद केलं नाही! मनं जिंकणारा व्हिडीओ पाहा

Cricket viral Video : संधी असूनही गोलंदाजानं धावबाद केलं नाही! मनं जिंकणारा व्हिडीओ पाहा

Jun 03, 2024 04:02 PM IST

T20 Blast 2024 Video : टी-20 ब्लास्ट २०२४ मधील एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये गोलंदाजाने फलंदाजाला धावबाद केले नाही, कारण नॉन-स्ट्राइक एंडवर असलेला फलंदाज चेंडू लागल्याने जखमी झाला होता.

Cricket Video : संधी असूनही गोलंदाजाने धावबादची संधी सोडून दिली, मनं जिंकणारा व्हिडीओ पाहा
Cricket Video : संधी असूनही गोलंदाजाने धावबादची संधी सोडून दिली, मनं जिंकणारा व्हिडीओ पाहा

Spirit Of Cricket In T20 Blast 2024 : क्रिकेटला जेंटलमन्स गेम विनाकारण म्हणतात नाही. क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्ती अनेकदा पाहायला मिळते. आता T20 ब्लास्ट २०२४ मधून असेच छान दृश्य पाहायला मिळाले.

टी-20 ब्लास्ट लीगमध्ये (२ जून) हॅम्पशायर आणि केंट यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात गोलंदाजाने फलंदाजाला बाद करण्याची संधी मुद्दाम सोडली. कारण फलंदाज हा चेंडू लागल्याने जखमी झाला होता. यामुळे संधी असूनही गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले नाही.

दुखापतीनंतर फलंदाज अर्ध्या क्रीजपर्यंत, गोलंदाजाकडे रनआऊट करण्याची संधी होती, पण तरीही गोलंदाजाने त्याला आऊट केले नाही.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओने अनेकांचे मन जिंकले आहे. सामन्याच्या पहिल्या डावातील शेवटच्या षटकात ही घटना घडली. हॅम्पशायरसाठी ख्रिस वुड डावातील शेवटचे षटक टाकत होता. वुडने चेंडू टाकला, ज्याचा सामना जॉय इव्हिसनने केला. इव्हिसनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू त्याच्या बॅटशी चांगला कनेक्ट झाला.

पण चेंडू थेट नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या मॅथ्यू पार्किन्सनकडे गेला. शेवटचे षटक असल्याने पार्किन्सन रन घेण्याच्या तयारीत होता. त्यामुळे धावला पण चेंडू थेट त्याच्या अंगावर येऊन आदळला. अशा स्थितीत पार्किन्सन चेंडू लागल्याने खाली पडला. तो क्रीजच्या बाहेर होता. तर चेंडू गोलंदाज ल्युक वूडच्या हातात होता.

पण वूडने पार्किन्सनला धावबाद केले नाही. ख्रिस वूडचे फलंदाजाला धावबाद न करणे स्पिरिट ऑफ गेम दर्शवते. चाहते आता वुडच्या या स्पिरीटचे कौतुक करताना दिसत आहेत.

हॅम्पशायरने सामना जिंकला

हॅम्पशायर आणि केंट यांच्यात साउथम्प्टनच्या द रोज बाउल येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात हॅम्पशायरने केंटचा ३ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केंट संघाने २० षटकात ९ गडी बाद १६५ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना हॅम्पशायरने १९.५ षटकांत ७ गडी राखून विजय मिळवला. हॅम्पशायरसाठी जो वेदरलीने सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने ३२ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या.

Whats_app_banner