Chris Martin Mentions Jasprit Bumrah in Coldplay Mumbai : म्युझिक बँड कोल्डप्लेचे म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर सुरू आहे. हा बँड सध्या भारतात आहे. गायक ख्रिस मार्टिन याने शनिवारी डीवाय पाटील स्टेडियमवर कोल्डप्ले कॉन्सर्टदरम्यान जसप्रीत बुमराह याचे नाव घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
शनिवारी रात्री 'स्काय फुल ऑफ स्टार्स' हे गाणे गाताना ख्रिस मार्टिनने परफॉर्मन्स थांबवला आणि बुमराहचा उल्लेख केला. यानंतर संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले. ख्रिस मार्टिन म्हणाला की, बुमराहला खेळायचे आहे, त्यामुळे शो लवकर संपवावा लागेल.
ख्रिस मार्टिनने विनोदाने म्हटले की, "थांबा, आम्हाला शो संपवावा लागेल कारण जसप्रीत बुमराहला बॅकस्टेजवर येऊन क्रिकेट खेळायचे आहे. तो मला गोलंदाजी करणार आहे." हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि टाळ्यांच्या कडकडाटाने वातावरण आणखीनच उत्साही झाले. बुमराह कदाचित रंगमंचावर येईल असे काही चाहत्यांना वाटले पण तसे झाले नाही.
ख्रिस मार्टिनने बुमराहचे नाव घेताच या अप्रतिम मैफलीत आणखीनच उत्साह वाढला. यावेळी मार्टिनने हिंदीत प्रेक्षकांचे आभार मानले आणि ‘धन्यवाद’ म्हणत सर्वांची मने जिंकली. त्याने पोस्टरवर लिहिलेले 'जय श्री राम' देखील वाचले आणि प्रेक्षकांना त्याचा अर्थ विचारला, यासाही चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
कोल्ड प्लेचे मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर १८, १९ आणि २१ जानेवारीला तीन शो होणार आहेत. सुमारे ४५००० चाहते अपेक्षित आहेत.
दरम्यान, जसप्रीत बुमराह या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये उपस्थित नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये नुकतेच ३२ बळी घेणारा बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग. , यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
संबंधित बातम्या