Chris Gayle Birthday : लहानपणी कचरा उचलला, चोरी केली, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आज ३७७ कोटींचा मालक-chris gayle turns 44 today happy birthday chris gayle west indies cricketer net worth is 377 crore ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Chris Gayle Birthday : लहानपणी कचरा उचलला, चोरी केली, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आज ३७७ कोटींचा मालक

Chris Gayle Birthday : लहानपणी कचरा उचलला, चोरी केली, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आज ३७७ कोटींचा मालक

Sep 21, 2024 12:59 PM IST

happy Birthday Chris Gayle : वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाजाचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी किंग्स्टन जमैका येथे झाला. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी ४८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

Chris Gayle Birthday : लहानपणी कचरा उचलला, चोरी केली, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आज ३७७ कोटींचा मालक
Chris Gayle Birthday : लहानपणी कचरा उचलला, चोरी केली, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आज ३७७ कोटींचा मालक (Surjeet Yadav)

वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि 'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज (२१ सप्टेंबर) ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस गेलला समोर पाहून चांगले चांगले गोलंदाज आपली लाईन आणि लेन्थ विसरू जायचे.

वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाजाचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी किंग्स्टन जमैका येथे झाला. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी ४८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

ख्रिस गेलने क्रिकेट विश्वावर आपली अनोखी छाप सोडली, ख्रिस गेलने सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले. ज्यामध्ये कसोटीतील त्रिशतक, वनडेतील द्विशतक आणि टी-20 मधील अनेक शतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानावर गेलची कामगिरी अगणित आहे.

ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. टी-20 फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर गेलने या फॉरमॅटमध्ये १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि १,००० हून अधिक षटकार ठोकले आहेत.

वनडेत द्विशतक झळकावणारा पहिला फलंदा

ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची शानदार खेळी करून ही कामगिरी केली होती. 

१९९९ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गेलने १०३ कसोटी, ३०१ एकदिवसीय आणि ७९ टी-20 सामने खेळून सर्व फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने १९,५८३ धावा केल्या, ज्यात ४२ शतकांचा समावेश आहे.

ख्रिस गेल सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक

ख्रिस गेल लहानपणी खूप गरिब होता. त्याला दोवेळचे जेवणही मिळत नसे. पण आज तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. ख्रिस गेलला त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.

ख्रिस गेलला लहानपणी चोरी करावी लागली

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून विकाव्या लागल्या. या काळात तो एका झोपडीत राहत असे. ख्रिस गेलने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या संघर्षाची कहाणी सांगितली होती. ख्रिस गेलच्या म्हणण्यानुसार, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चिप्स विकायची.

लहानपणी मुलभूत गरजांसाठी झगडत असतानाही आणि ख्रिस गेलने हिंमत सोडली नाही. त्याने एकवेळच्य जेवणासाठी लहानपणी चोरीचे कामही केले आहे. पण आज ख्रिस गेल आपल्या कुटुंबासोबत खूप छान आयुष्य जगत आहे. त्याची एकूण संपत्ती ३७७ कोटी रुपये आहे. कचरा उलणारा मुलगा ते क्रिकेट सुपरस्टार बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Whats_app_banner
विभाग