Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीचे सामने 'या' ऐतिहासिक मैदानावर रंगणार, रोहित-विराट खेळणार? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीचे सामने 'या' ऐतिहासिक मैदानावर रंगणार, रोहित-विराट खेळणार? जाणून घ्या

Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीचे सामने 'या' ऐतिहासिक मैदानावर रंगणार, रोहित-विराट खेळणार? जाणून घ्या

Published Aug 12, 2024 01:52 PM IST

सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश होऊ शकतो.

Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीचे सामने 'या' ऐतिहासिक मैदानावर रंगणार, रोहित-विराट खेळणार? जाणून घ्या
Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीचे सामने 'या' ऐतिहासिक मैदानावर रंगणार, रोहित-विराट खेळणार? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाने अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. यानंतर टीम इंडियाचे पुढील टास्क बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिका खेळणे आहे.

मात्र, श्रीलंका मालिकेनंतर बांगलादेश मालिकेत सुमारे ४० दिवसांचे अंतर आहे. आता या अंतरामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक भारतीय स्टार्स देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफी २०२५ खेळताना दिसू शकतात.

एका वृत्तानुसार, दुलीप ट्रॉफीचे सामने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे खेळणार नाहीत.

दरम्यान, दुलीप ट्रॉफीसाठी आधी आंध्र प्रदेशातील अनंतपूर हे ठिकाण निश्चित करण्यात आले होते, पण ते आता बदलण्यात येणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) विनंतीवरून चिन्नास्वामी स्टेडियमवर दुलीप ट्रॉफीचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत."

हार्दिक-बुमराह खेळणार नाहीत 

सुत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह वगळता इतर सर्व अव्वल खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केएल राहुल, शुभमन गिल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांच्या नावांचा समावेश अव्वल खेळाडूंमध्ये होऊ शकतो. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळायचे की न खेळायचे हा पर्याय देण्यात आला आहे.

हार्दिक पांड्या या स्पर्धेतून गायब आहे. वास्तविक, हार्दिक लाल चेंडूचे क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे तो या मालिकेत भाग घेण्याची अपेक्षा नाही. याशिवाय जसप्रीत बुमराह यालाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यापासून सूट मिळू शकते. इतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील या मालिकेत भाग घेऊ शकत नाही कारण तो दुखापतीतून सावरत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या