Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने द्विशतकासह इतिहास रचला, डॉन ब्रॅडमन यांच्या या खास क्लबमध्ये सामील-cheteshwar pujara double hundred in ranji trophy entered don bradman club most double hundred in first class cricket ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने द्विशतकासह इतिहास रचला, डॉन ब्रॅडमन यांच्या या खास क्लबमध्ये सामील

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने द्विशतकासह इतिहास रचला, डॉन ब्रॅडमन यांच्या या खास क्लबमध्ये सामील

Jan 07, 2024 03:31 PM IST

Cheteshwar Pujara Double Hundred In Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजाराने झारखंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात नाबाद २४३ धावांची इनिंग खेळली.

Cheteshwar Pujara Double Hundred
Cheteshwar Pujara Double Hundred

Most Double Hundred In Ranji Trophy : चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना चपराक लगावली आहे. वास्तविक, टीम इंडिया नुकतीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून डच्चू देण्यात आला होता.

पण आता पुजाराने झारखंडविरुद्ध द्विशतक झळकावून (Cheteshwar Pujara Dदहवता Century in Ranji Trophy) इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी आपला दावा पक्का केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

 रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजाराने झारखंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात नाबाद २४३ धावांची इनिंग खेळली. 

सर्वाधिक द्विशतके पुजाराच्या नावावर

या द्विशतकासह पुजाराने एक खास विक्रम केला आहे. या द्विशतकासह, पुजारा प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारा संयुक्तरित्या चौथा फलंदाज ठरला आहे. दुहेरी शतकासह पुजारा ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत सामील झाला आहे.

पुजाराचे हे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील १७ वे द्विशतक होते. झारखंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी पुजाराने द्विशतक पूर्ण केले. पुजाराने ३० चौकारांच्या मदतीने नाबाद २४३ धावा केल्या. प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक द्विशतके ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहेत. ब्रॅडमन यांनी ३७ द्विशतके झळकावली आहेत. यानंतर इंग्लंडचा माजी दिग्गज वॅली हॅमंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३६ द्विशतके झळकावली आहेत.

पुजारा संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर

त्यानंतर या यादीत तिसरे नाव इंग्लंडच्या पॅटसी हेंद्रेनचे आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण २२ द्विशतके झळकावली. यानंतर इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लंडचा रामप्रकाश आणि भारताचा चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १७-१७ प्रथम श्रेणी द्विशतकांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

३७ द्विशतके - ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

३६ द्विशतके - हॅमंड (इंग्लंड)

२२ द्विशतके - हेन्ड्रेन (इंग्लंड)

१७ द्विशतके - सटक्लिफ (इंग्लंड)

१७ द्विशतके - रामप्रकाश (इंग्लंड)

१७ * द्विशतक - पुजारा (भारत).

सौराष्ट्राचा डाव ५७८ धावांवर घोषित

झारखंड विरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्राने पुजाराचे द्विशतक आणि प्रेरक मांकडच्या शतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना सौराष्ट्रने ८ विकेट्सवर ५७८ धावा करून डाव घोषित केला. संघासाठी पुजाराने २४३* आणि प्रेरक मंकडने १०४* धावा केल्या.

Whats_app_banner