Cheteshwar Pujara Century : रणजी सामन्यात पुजाराचं शानदार शतक, शुभमन गिलच्या अडचणी वाढल्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cheteshwar Pujara Century : रणजी सामन्यात पुजाराचं शानदार शतक, शुभमन गिलच्या अडचणी वाढल्या

Cheteshwar Pujara Century : रणजी सामन्यात पुजाराचं शानदार शतक, शुभमन गिलच्या अडचणी वाढल्या

Jan 06, 2024 05:02 PM IST

Cheteshwar Pujara Century : टीम इंडिया नुकतीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून डच्चू देण्यात आला होता.

Cheteshwar Pujara Century
Cheteshwar Pujara Century

Cheteshwar Pujara Century Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराने शतक झळकावले आहे. सौराष्ट्राकडून खेळताना पुजाराने झारखंडविरुद्ध १६२ चेंडूत शतक पूर्ण. त्याने आपल्या शतकात १० चौकार मारले. या शतकासह पुजाराने टीम इंडियाच्या निवड समितीला जोरदार चपराक लगावली आहे.

दरम्यान, हे वृत्त लिहिपर्यत २१५ चेंडूत १३८ धावांवर खेळत होता, त्याने आतापर्यंत १६ चौकार मारले आहेत.

वास्तविक, टीम इंडिया नुकतीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून डच्चू देण्यात आला होता.

पण आता पुजाराने झारखंडविरुद्ध शतक झळकावून (Cheteshwar Pujara Century in Ranji Trophy) इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी आपला दावा पक्का केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता, मात्र गिलची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. चेतेश्वर पुजारा भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये बराच काळ तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करत आलेला. आता या शतकामुळे शुभमन गिलच्या अडचणीत भर पडली आहे.

उभय संघांमधील पहिली कसोटी २५ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. झारखंडविरुद्धच्या शानदार शतकानंतर चेतेश्वर पुजाराने भारत-इंग्लंड मालिकेसाठी आपला दावा मजबूत केल्याचे मानले जात आहे.

चेतेश्वर पुजाराची कसोटी कारकिर्द

चेतेश्वर पुजाराने भारतासाठी आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळे आहेत. यात त्याने ७१९५ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराची या फॉरमॅटमध्ये सरासरी ४३.६१ आहे. त्याच्या नावावर १९ शतके आणि ३५ अर्धशतके आहेत. तसेच चेतेश्वर पुजाराने कसोटी सामन्यात ३ द्विशतके झळकावली आहेत.

आता या शतकानंतर पुजाराची इंग्लंड मालिकेसाठी निवड होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या