मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराचा राजकोटमध्ये धमाका, बॅझबॉल स्टाईलमध्ये इतक्या चेंडूत ठोकलं शतक

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराचा राजकोटमध्ये धमाका, बॅझबॉल स्टाईलमध्ये इतक्या चेंडूत ठोकलं शतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 18, 2024 11:08 AM IST

Cheteshwar Pujara Century, Ranji Trophy 2024 : राजकोटमध्येच टीम इंडियातून बाहेर असलेला सीनियर फलंदाज चेतेश्वर पुजाराने स्फोटक शतकी खेळी केली आहे. पुजाराने शनिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ६३ वे शतक झळकावले.

Cheteshwar Pujara Century, Ranji Trophy 2024
Cheteshwar Pujara Century, Ranji Trophy 2024 (PTI)

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सध्या राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे.

पण दुसरीकडे, राजकोटमध्येच टीम इंडियातून बाहेर असलेला सीनियर फलंदाज चेतेश्वर पुजाराने स्फोटक शतकी खेळी केली आहे. पुजाराने शनिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ६३ वे शतक झळकावले. विशेष म्हणजे पुजाराने 'बॅझबॉल' स्टाइलमध्ये खेळून वेगवान खेळी खेळली.

पुजारा शानदार फॉर्मात

राजकोटच्या सनोसारा क्रिकेट मैदानावर सौराष्ट्र आणि मणिपूर यांच्यात रणजी करंडक सामना खेळला जात आहे. या सामन्यात पुजाराने मणिपूरविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने अवघ्या १०२ चेंडूत शतक झळकावले. चेतेश्वर पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ६३ वे शतक आहे. पुजारा १०५ चेंडूत १०८ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला.

रणजी ट्रॉफीच्या या मोसमात चेतेश्वर पुजारा उत्कृष्ट फॉर्मात आहे. तो सातत्याने मोठी खेळी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पण त्याची टीम इंडियात निवड होत नाही आहे. या वर्षी पुजाराने रणजीमध्ये २४३*, ४९, ४३, ४३, ६६, ९१, ३, ०, ११०, २५ आणि १०८ धावांची खेळी खेळली आहे. 

त्याचवेळी, या सामन्यापूर्वी त्याने ७ सामन्यात ७७ च्या सरासरीने ६७३ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये  पुजारा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर ८१-८१ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर राहुल द्रविड ६८ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पुजारा टीम इंडियातून बाहेर

चेतेश्वर पुजारा गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पुजाराने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तो टीम इंडियात परतला नाही.

WhatsApp channel