आयपीएल २०२५ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करेल.
विल जॅक आणि रायन रिक्लेटन या दोघांनाही एमआयमध्ये संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम करन, आर अश्विन, नूर अहमद आणि मथिशा पाथिराना.
हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जात आहे. जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी संथ होत जाते, ज्यामुळे फिरकीपटू आणखी धोकादायक ठरतात. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये दव देखील एक मोठा घटक असू शकतो.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ३९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबई संघाने २१ वेळा तर चेन्नईने १८ वेळा विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या ६ सामन्यांपैकी सीएसकेने ५ वेळा विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या