आयपीएल २०२५ रिटेंशन लिस्ट रिलीझ करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमी CSK-RCB आणि पंजाबसह सर्व १० आयपीएल संघांच्या रिटेन्शन यादीची वाट पाहत आहेत.
पण या दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. ही पोस्ट समजणे कठीण आहे, परंतु लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत आहेत.
सीएसकने त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काही इमोजी शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "आप जिन्हें पाने की कोशिश करते हैं, वो आपको पाने की कोशिश में है." सीएसकेची ही पोस्ट काही वेळातच तुफान व्हायरल झाली.
ही पोस्ट पाहून काही चाहत्यांनी सांगितले की, CSK ने रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांना रिटेन करणय्याचे संकेत दिले आहेत.
यानंतर हे इमोजी पाहून आणखी एका युजरने सांगितले की, ऋतुराज गायकवाड हा संघाचा स्टार खेळाडू आहे, मथिशा पाथीराना कुक आहे, तर रवींद्र जडेजाला तलवार कशी वापरायची हे माहित आहे आणि हेलिकॉप्टर एमएस धोनीच्या नावाचे संकेत देत आहे.
तसेच, एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये फोटो शेअर करून हे जुने ट्विट असल्याचे सांगितले आहे. जे सीएसकेने पुन्हा शेअर केले आहे. त्याने सांगितले की नोव्हेंबर २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या 'X' अकाऊंटवरून असेच ट्विट केले गेले होते.
दरम्यान, सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीने नुकतेच पुढील २-३ वर्षे क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही एमएस धोनीला खेळताना पाहून खूप आनंद मिळेल असे विधान केले होते. धोनी लवकरच CSK चे चेअरमन एन श्रीनिवासन यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिटेन्शन यादीबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे नमूद करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ऋतुराज गायकवाड पहिल्या क्रमांकाचा रिटेन्शन राहणार नाही. रवींद्र जडेजाने या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यावेळी त्याला पहिल्या क्रमांकाचे रिटेन्शन मिळू शकते.
संबंधित बातम्या