जर आपण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांबद्दल बोललो तर महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांची नावे डोळ्यासमोर येतात. या दोन्ही दिग्गजांनी कर्णधार म्हणून ५-५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
महेंद्रसिंह धोनी याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला विक्रमी ५ चॅम्पियन बनवले.
मात्र, आता चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनी याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की "अवर ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम... या व्हिडिओमध्ये माही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे.
आता, महेंद्रसिंह धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
महेंद्रसिंह धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. सोबतच धोनीने ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
यानंतर २०११ चा एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी फॉर्मेटमध्ये नंबर-वन बनला. धोनीने वनडे, कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ४८७६, १०७७३ आणि १६१७ धावा केल्या आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये माहीचा सर्वोत्तम स्कोअर २२४, १८३ आणि ५६ धावा आहे.
धोनीने IPL च्या २६४ सामन्यांमध्ये ३९.१३ च्या सरासरीने आणि १३७.५४ च्या स्ट्राईक रेटने ५२४३ धावा केल्या आहेत. या यष्टीरक्षक फलंदाजाची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणना केली जाते.