मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रचिन की डॅरिल मिशेल ओपनिंगला कोण? समीर रिझवी इम्पॅक्ट प्लेयर; अशी असू शकते CSK ची प्लेइंग इलेव्हन

रचिन की डॅरिल मिशेल ओपनिंगला कोण? समीर रिझवी इम्पॅक्ट प्लेयर; अशी असू शकते CSK ची प्लेइंग इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 10, 2024 01:47 PM IST

Chennai Super Kings CSK Playing For 11 IPL 2024 : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सराव शिबिरात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (ms dhoni) सहभाग घेतला.

CSK Playing 11 For IPL 2024 : रचिन की डॅरिल मिशेल ओपनिंगला कोण? समीर रिझवी इम्पॅक्ट प्लेयर; अशी असू शकते CSK ची प्लेइंग इलेव्हन
CSK Playing 11 For IPL 2024 : रचिन की डॅरिल मिशेल ओपनिंगला कोण? समीर रिझवी इम्पॅक्ट प्लेयर; अशी असू शकते CSK ची प्लेइंग इलेव्हन (PTI)

CSK Playing 11 For IPL 2024 : आगामी आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.

या महामुकाबल्यापूर्वी, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सराव शिबिरात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (ms dhoni) सहभाग घेतला.

दरम्यान, गेल्या मोसमात चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ससमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. वास्तविक, संघाचा स्टार सलामीवीर डेव्हन कॉनवे दुखापतग्रस्त असून तो मेपर्यंत स्पर्धेतून बाहेर राहणार आहे.

कॉनवे बाहेर पडल्यानंतर आता सलामीला कोण खेळणार हा प्रश्न आहे. याशिवाय दुसरा प्रश्न हा आहे की नवा सलामीवीर कॉनवेची पोकळी भरून काढू शकेल का? या ठिकाणी आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

CSK कडून सलामीला कोण खेळणार?

सीएसकेला ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला खेळणारा नवा पार्टनर शोधावा लागणार आहे. गायकवाडसह न्यूझीलंडचा रचिन रवींद्र सलामीला दिसू शकतो. आयपीएल २०२४ साठी झालेल्या मिनी लिलावात रचिनला चेन्नईने १.८० कोटी रुपयांना विकत घेतले. सोबतच न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलदेखील सलामीला खेळू शकतो. तो टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला खेळला आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये रचिन रविंद्र आणि डॅरिल मिशेल या दोघांनीही जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर टॉप ऑर्डरमध्ये अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. रहाणेने आयपीएल २०२३ मध्ये संघासाठी चमकदार कामगिरी केली होती.

अशी असू शकते सीएसकेची मिडल ऑर्डर

मधल्या फळीची सुरुवात इंग्लिश अष्टपैलू मोईन अलीपासून होऊ शकते. मोईन २०२१  पासून CSK साठी विश्वसनीय अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर शिवम दुबे खेळेल. शिवममध्ये झटपट फलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मुख्य फिनिशर म्हणून सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो.

यानंतर रवींद्र जडेजा खालच्या मधल्या फळीत ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तथापि, धोनी आणि जडेजाच्या बॅटिंग क्रमांकामध्ये अदलाबदल होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आठव्या क्रमांकावर आणि दीपक चहर ९व्या क्रमांकावर दिसतील. शार्दुल आणि दीपक यांच्यात वेगवान फलंदाजीची उत्तम क्षमता आहे.

त्यानंतर पुढे महिष थिक्षाना मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून १०व्या क्रमांकावर दिसू शकतो. यानंतर धोनीचा ट्रम्प कार्ड वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना असेल. मात्र, पाथिराना सध्या दुखापतग्रस्त असून तो वेळेवर बरा झाला नाही, तर वेगवान गोलंदाज म्हणून मुस्तफिझूर रहमानकडे पाहिले जाऊ शकते. मुस्तफिजूरला CSK ने २ कोटी रुपये देऊन विकत घेतले होते.

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन- ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महिष थीक्शाना, मथिशा पाथीराना/मुस्तिझाफ रहमान.

इम्पॅक्ट प्लेयर- समीर रिझवी.

IPL_Entry_Point