India Squad Announcement Date For Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आता या स्पर्धेसाठी केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयसीसीने ८ वर्षांनंतर ही स्पर्धा परत आणली आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी १२ जानेवारीपर्यंत सर्व संघांची घोषणा होणे अपेक्षित आहे. पण यासाठी विलंब होऊ शकतो. क्रिकबझने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नियमानुसार संघ जाहीर करण्यासाठी निवड समिती आयसीसीकडे आणखी काही वेळ मागू शकते. मात्र, येत्या काही दिवसांत इंग्लंडविरुद्धच्या टी-20 संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जेव्हा जेव्हा एखादी जागतिक किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धा असते तेव्हा नियमानुसार संघांना एक महिना आधी संघ जाहीर करावा लागतो. मात्र, नंतर त्यात काही बदल करता येऊ शकतात. पण यावेळी आयसीसीने ५ आठवडे अगोदर संघ जाहीर करण्याचे आदेश दिले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये तेच खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे, ज्यांना इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत संधी दिली जाईल.
दरम्यान, यापूर्वी भारतीय संघाची घोषणा १२ जानेवारीपर्यंत होणार होती. पण आता क्रिकबझच्या मते, १८ किंवा १९ जानेवारीला टीम इंडियाची घोषणा होणार आहे. त्यानंतर बरोबर एक महिना म्हणजे १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात फारसे बदल होणार नसल्याचेही समोर आले आहे.
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळलेले बहुतेक तेच खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सामील केले जातील.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी भारतीय संघासाठी चांगली बातमी म्हणजे मोहम्मद शमीला बेंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्सकडून त्याच्या फिटनेसवर लवकरच क्लीन चीट मिळणार आहे. अशा परिस्थितीत शमी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो.
संबंधित बातम्या