AFG vs AUS : आज जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाईल, लाहोरमध्ये रंगणार अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया थरार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AFG vs AUS : आज जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाईल, लाहोरमध्ये रंगणार अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया थरार

AFG vs AUS : आज जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाईल, लाहोरमध्ये रंगणार अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया थरार

Published Feb 28, 2025 11:08 AM IST

AFG vs AUS Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.

AFG vs AUS : आज जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाईल, लाहोरमध्ये रंगणार अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया थरार
AFG vs AUS : आज जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाईल, लाहोरमध्ये रंगणार अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया थरार

Afghanistan vs Australia Todays Match : अफगाणिस्तान क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या जवळ आहे. अफगाणिस्तान  पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या जवळ आहे. मात्र अफगाणिस्तानसाठी हा मार्ग सोपा असणार नाही. 

अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी आज (२८ फेब्रुवारी) लाहोरमध्ये सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील हा १० वा सामना असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो सेमी फायनलमध्ये एन्ट्री करेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अफगाणिस्तानने पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. मात्र यामध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना १०७ धावांनी जिंकला होता. यानंतर अफगाणिस्तानने पुनरागमन करत इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडचा पराभव करून त्याने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला  भिडणार आहे.

उपांत्य फेरीचे संपूर्ण समीकरण

ब गटातील गुणतालिकेवर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिका पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहेत तर दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना रद्द झाला आहे. या दोन्ही संघांचे ३-३ गुण आहेत. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवले तर ते उपांत्य फेरीत पोहोचेल. अफगाणिस्तान जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे हा सामना करो किंवा मरो अअसा असणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन्ही संघ -

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट, तन्वीर संघा

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, राशिद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इकराम अलीखिल, नांगेलिया खरोटे, नवीद झाद्रान.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या