Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रीड मॉडेल' मंजूर, भारताचे सामने या देशात रंगणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रीड मॉडेल' मंजूर, भारताचे सामने या देशात रंगणार

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रीड मॉडेल' मंजूर, भारताचे सामने या देशात रंगणार

Dec 13, 2024 09:18 PM IST

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी 'हायब्रीड मॉडेल'ला मान्यता देण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे.

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रीड मॉडेल' मंजूर, या देशात रंगणार भारताचे सामने
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रीड मॉडेल' मंजूर, या देशात रंगणार भारताचे सामने (PCB X)

ICC Champions Trophy 2025 Hybrid Model : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी 'हायब्रीड मॉडेल' मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय आयसीसीने पाकिस्तान बोर्डाची एक मोठी अटही मान्य केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या करारानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाचे सामने दुबईत होणार आहेत.

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १० सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. साखळी फेरीतील भारताचे तिन्ही सामने दुबईत होणार आहेत. भारताच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त, स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील दुबईमध्ये होणार आहेत. 

जर टीम इंडिया बाद फेरीआधी स्पर्धेतून बाहेर पडली तर उपांत्य फेरी आणि फायनल लाहोर आणि रावळपिंडीमध्ये होतील.

पाकिस्तानला नुकसानभरपाई मिळणार नाही

भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यास त्यांना भरपाई दिली जाईल, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली होती, पण. आयसीसीने ही भरपाईची मागणी फेटाळून लावली आहे.

२०२६ च्या टी-20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तान भारतात येणार नाही

दरम्यान, हे प्रकरण एवढ्यावरच संपले नाही. आता पाकिस्तानी संघ २०२६ च्या टी-20 वर्ल्डकपसाठी भारत दौऱ्यावर येणार नसल्याचेही समोर आले आहे. 

टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्यात असणार आहे. पाकिस्तानने त्यांचे सामने कोलंबोमध्ये खेळवण्याची मागणी केली. मात्र, T20 विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यांबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या