बॅटने षटकार मारू शकतो, तर तलवारीने… चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात जावेद मियांदादचा व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बॅटने षटकार मारू शकतो, तर तलवारीने… चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात जावेद मियांदादचा व्हिडीओ व्हायरल

बॅटने षटकार मारू शकतो, तर तलवारीने… चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात जावेद मियांदादचा व्हिडीओ व्हायरल

Nov 13, 2024 03:45 PM IST

Javed Miandad Threatened Team India Video : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्याआधीच भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता त्यात जावेद मियांदाद याची एन्ट्री झाली आहे.

champions trophy 2025 : बॅटने षटकार मारू शकतो, तर तलवारीने… चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात जावेद मियांदादचा व्हिडीओ व्हायरल
champions trophy 2025 : बॅटने षटकार मारू शकतो, तर तलवारीने… चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात जावेद मियांदादचा व्हिडीओ व्हायरल

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जसजशी जवळ येत आहे, तसतसे या स्पर्धेशी संबंधित नवीन वाद समोर येत आहेत. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. अशा स्थितीत ही स्पर्धे खेळण्यासाठी ८ संघांना पाकिस्तानला जायचे आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याच्या मनस्थितीत नाही.

अशा स्थितीत पाकिस्तानकडून द्वेषपूर्ण वक्तव्ये येत आहेत. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद याने घृणास्पद विधान केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जावेद मियांदादचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याचा भारतात मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे. या व्हिडीओमध्ये जावेद मियांदाद काही कार्यक्रमानिमित्त रस्त्यावरील गर्दीत उभा आहे आणि त्याने पाकिस्तान संघाची जर्सी घातली आहे. सोबतच त्याच्या हातात तलवारही आहे. यावेळी तो चिथावणीखोर वक्तव्य आणि इशारे करताना दिसत आहे. पण, या व्हिडिओमध्ये त्याने कुठेही भारताचे नाव घेतलेले नाही.

व्हिडिओमध्ये मियांदाद तलवार फिरवत म्हणतो, की "मी बॅटने षटकार मारला होता, आता हे शस्त्र चालेल." शेजारी उभा असलेला एक माणूस म्हणतो, “बॅटही तीक्ष्ण होती आणि तलवारही तीक्ष्ण आहे.”

यानंतर मियांदाद म्हणतो, "जर मी बॅटने षटकार मारू शकतो, तर मी कापू शकत नाही का?" एवढेच नाही तर तो काश्मीरबाबतही विधान करतो, ज्यामुळे भारतीय चाहते नाराज आहेत.

या व्हिडिओबाबत अनेक पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि मीडियाही जावेद मियांदादवर नाराज आहेत. विशेषत: पीसीबी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पटवण्याचा प्रयत्न करत असताना अशा विधानांमुळे पाकिस्तानच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे.

Whats_app_banner