India Squad Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. आता बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उद्या शनिवारी (१८ जानेवारी) टीम इंडियाची घोषणा होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकाही खेळायची आहे. पण त्याआधी २२ जानेवारीपासून ५ टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार असून, त्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र वनडे मालिकेची घोषणा होणे बाकी आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा एकाच वेळी केली जाणार आहे.
टीम इंडियाची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी १२:३० वाजता ही परिषद होणार आहे. या परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सहभागी होणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान करणार आहे.
मात्र, टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. स्पर्धेसाठी ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून त्यात गट-अ आणि गट-ब यांचा समावेश आहे. टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. टीम इंडिया २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
टीम इंडियाने २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता यावेळच्या स्पर्धेत टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या