Champions Trophy 2025 Semi final Teams : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत आतापर्यंत ३ संघांनी एन्ट्री केली आहे. न्यूझीलंड आणि भारतानंतर ऑस्ट्रेलिया संघानेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. याशिवाय तीन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
यजमान पाकिस्तान क्रिकेट संघाची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. यावेळी पाकिस्तान संघाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. आता उपांत्य फेरीत एका संघाचे स्थान बाकी आहे. दक्षिण आफ्रिका किंवा अफगाणिस्तानला पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे.
वास्तविक, चॅम्पियन्स ट्रॉफीचा १०वा सामना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. लाहोरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १२.५ षटकांत १०९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबला. सामना पूर्ण न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला.
ब गटातून उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचे ३ पैकी २ सामने पावसामुळे दोन सामने रद्द झाले. तर त्यांनी एका सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने ४ गुण मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. पण आता दक्षिण आफ्रिका किंवा अफगाणिस्तानला पुढे जाण्याची संधी मिळेल. या दोन्ही संघांचे सध्या ३-३ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा एक सामना बाकी आहे.
अ गटात न्यूझीलंड आणि भारत हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियन संघानेही उपांत्य फेरी गाठली आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. इंग्लंडचा क्रिकेट संघही या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इंग्लंडने २ सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत. त्यांचा शेवटचा सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.
संबंधित बातम्या