Champions Trophy Live Streaming in India : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता ४८ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात १९ फेब्रुवारीला होणार आहे. टीम इंडिया २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत पहिला सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड पद्धतीने खेळवली जात आहे.
अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया दुबईला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आपले सामने कुठे आणि कधी खेळणार आहे, हे जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सर्व सामने JioStar नेटवर्कवर स्ट्रीम केले जातील. पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर १६ फीडवर ICC टूर्नामेंट लाइव्ह स्ट्रीम केली जाईल. यात ९ वेगवेगळ्या भाषांचा समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये चाहत्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या त्यांच्या आवडत्या भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना कोणताही प्लॅन खरेदी करावा लागणार नाही. खुद्द स्टार नेटवर्कने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने मोफत पाहू शकणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही.
डिजिटल प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, तुम्ही वेगवेगळ्या भाषा पर्यायांमध्ये स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स १८ चॅनेलवर टेलिव्हिजनवर सामन्याचा उत्साह पाहू शकता.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वात मोठा सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आहे. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अशा परिस्थितीत, JioStar च्या नेटवर्कवर विक्रमी संख्येने चाहते सामना पाहतील अशी अपेक्षा आहे.
अ गट - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
पाकिस्तान व्यतिरिक्त भारताच्या गटातील इतर दोन संघ बांगलादेश आणि न्यूझीलंड आहेत. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी होईल. त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तानला भिडल्यानंतर टीम इंडिया २ मार्चला न्यूझीलंडला टक्कर देईल. हे सर्व सामने दुबईत होणार आहेत.
संबंधित बातम्या