आयसीसीनं PCB ला लॉलीपॉप दाखवलं! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राडा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आयसीसीनं PCB ला लॉलीपॉप दाखवलं! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राडा

आयसीसीनं PCB ला लॉलीपॉप दाखवलं! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राडा

Dec 15, 2024 02:13 PM IST

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल तयार करण्यात आले आहे, परंतु यावरून आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील अंतर्गत मतभेदांचे प्रकरण समोर आले आहे.

आयसीसीनं PCB ला लॉलीपॉप दाखवलं! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राडा
आयसीसीनं PCB ला लॉलीपॉप दाखवलं! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात राडा

PCB Hybrid Model Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे. याअंतर्गत भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपले सामने पाकिस्तानऐवजी अन्य ठिकाणी खेळणार आहे.

पण या दरम्यान, एका नवीन माहिती समोर आली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत. 

आयसीसीने घोषित केले आहे की हायब्रीड मॉडेल अंतर्गत भारत आपले सामने दुबईमध्ये खेळणार आहे, तर उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळली जाईल.

आयएएनएसच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले की, पीसीबीचे काही अधिकारी हायब्रीड मॉडेलच्या स्वीकारावर खूश नाहीत. सोबतच असेही सांगण्यात आले आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळ सुरू आहे आणि पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आयसीसीच्या एका प्लॅनला कसे बळी पडले यावर बरेच पीसीबीमधील लोक खूश नाहीत.

दिग्गज क्रिकेटर राशिद लतीफ देखील अशा लोकांपैकी एक आहे जे पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल स्वीकारल्याने खूश नाही.

हायब्रीड मॉडेलच्या बदल्यात पाकिस्तानला काय मिळाले?

चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तान नाही गेल्यास पुढील ३ वर्षांत भारतात होणाऱ्या आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पाकिस्तानी संघासाठी हायब्रीड मॉडेल लागू करावे, अशी पाकिस्तानची अट होती. पाकिस्तानची ही अट मान्य करण्यात आली आहे.

हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यासाठी, ICC ने पाकिस्तानला २०२७ नंतर ICC महिला स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने या मुद्द्यावरून आयसीसीवर जोरदार टीका केली होती. तो म्हणाला, "लॉलीपॉप म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का. आयसीसीने पीसीबीला लॉलीपॉप दिला आहे

तुम्हाला आणखी एक आयसीसी इव्हेंट आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले. पण याचा पाकिस्तानला फायदा होणार नाही." 

बासित अली म्हणाला की, महिलांच्या स्पर्धेऐवजी पाकिस्तानने पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे आयोजन यजमानपद मागायला हवे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या