आयसीसीने पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आयसीसीने मैदानावरील अंपायर, थर्ड अंपायर आणि सामनाधिकारी यांची नावे जाहीर केली आहेत. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ मार्च रोजी दुबई येथे खेळवला जाणार आहे.
तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने होतील, हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे दुबई येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून काम पाहतील. तर या सामन्यात मायकेल गफ हे तिसरे पंच तर अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारीच्या भूमिकेत असतील.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये होणार आहे. या सामन्यात मैदानावरील पंच श्रीलंकेचा कुमार धर्मसेना आणि ऑस्ट्रेलियाचा पॉल रीफेल असतील. जोएल विल्सन हे तिसरे पंच तर रंजन मदुगले या सामन्याचे सामनाधिकारी असतील.
मैदानावरील पंच: ख्रिस गॅफनी आणि रिचर्ड इलिंगवर्थ
थर्ड अंपायर: मायकेल गफ
फोर्थ अंपायर : एड्रियन होल्डस्टॉक
सामनाधिकारी: अँडी पायक्रॉफ्ट
मैदानी पंच: कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल
थर्ड अंपायर : जोएल विल्सन
फोर्थ पंच: अहसान रझा
सामनाधिकारी: रंजन मदुगले
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध ६ विकेटने जिंकला. या सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावले, तर मोहम्मद शमीने ५ बळी घेतले.
यानंतर संघाने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. भारताने ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध ४४ धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर ग्रुप स्टेजमध्ये फक्त एकच सामना जिंकला. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना ५ गडी राखून जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतचा दुसरा सामना आणि अफगाणिस्तानसोबतचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला.
संबंधित बातम्या