Champions Trophy : टीम इंडिया पाकिस्तानात का जाणार नाही? BCCI ने ICC ला पत्र लिहून सांगितलं खरं कारण
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Champions Trophy : टीम इंडिया पाकिस्तानात का जाणार नाही? BCCI ने ICC ला पत्र लिहून सांगितलं खरं कारण

Champions Trophy : टीम इंडिया पाकिस्तानात का जाणार नाही? BCCI ने ICC ला पत्र लिहून सांगितलं खरं कारण

Nov 15, 2024 04:28 PM IST

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ९ मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Champions Trophy : टीम इंडिया पाकिस्तानात का जाणार नाही? BCCI ने ICC ला पत्र लिहून सांगितलं खरं कारण
Champions Trophy : टीम इंडिया पाकिस्तानात का जाणार नाही? BCCI ने ICC ला पत्र लिहून सांगितलं खरं कारण (PTI)

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन पाकिस्तानात होणार आहे. आयसीसीच्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवण्याच्या मनस्थितीत नाही.

आता यामागील कारण देखील समोर येत आहे. बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये ही बाब समोर आली आहे.

टीम इंडिया पाकिस्तानला का जाणार नाही?

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने आपल्या पत्रात सुरक्षेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. यासोबतच त्यांनी आयसीसीला सविस्तर कागदपत्र पाठवले असून, त्यात पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख आहे.

या दस्तऐवजात पाकिस्तानमधील सीमेपलीकडील दहशतवाद आणि भारतीय क्रिकेट संघाविरोधातील संभाव्य उच्च धोक्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. बीसीसीआयचा असा विश्वास आहे की सामान्य पाकिस्तानी जनतेने स्वागत केले तरीही टीम इंडिया दहशतवाद्यांचे संभाव्य लक्ष्य बनू शकते, जसे २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघासोबत घडले होते. गेल्या वर्षभरात पाकिस्तानात घडलेल्या अनेक दहशतवादी घटनांचाही या अहवालात उल्लेख आहे.

टीम इंडिया २००६ मध्ये शेवटची पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. यावेळी पाकिस्तानला न जाण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आव्हान दिले आणि म्हटले की 'हायब्रिड मॉडेल'द्वारे होस्टिंग करणे शक्य होणार नाही. पीसीबीचे म्हणणे आहे की, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तरी संपूर्ण स्पर्धा केवळ पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाईल.

आता ICC काय करणार?

पीसीबी आणि बीसीसीआयच्या कठोर भूमिकेमुळे आता आयसीसीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आयसीसीकडे तीन पर्याय आहेत.

१) चॅम्पियन्स ट्रॉफी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येऊ शकते. या निर्णयामुळे आयसीसी आणि पीसीबीचे मोठे नुकसान होऊ शकते.

२) बीसीसीआयच्या हायब्रीड मॉडेलच्या प्रस्तावाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सहमती दर्शवू शकते. अशा स्थितीत स्पर्धेतील १५ पैकी ५ सामने यूएईमध्ये खेळवले जातील.

३) चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून पूर्णपणे काढून घेतले जाऊ शकते.

Whats_app_banner