चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. आयसीसीने सर्वांना १२ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. १२ जानेवारीपर्यंत संघाची घोषणा केली जाणार असून १३ फेब्रुवारीपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना स्थान मिळणार नाही, अशी भविष्यवाणी माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने केली आहे.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “मला वाटतं सूर्यकुमार यादव या टीमचा भाग असणार नाही. तो एकदिवसीय खेळत नाही आणि विजय हजारेमध्येही त्याने धावा केल्या नाहीत.
संजू सॅमसन तर अजिबात खेळला नाही. एक खेळला नाही आणि दुसऱ्याने धावा केल्या नाहीत. मला असे वाटते की चॅम्पियन्स ट्रॉफी संघात यांचे येणे थोडे कठीण जाईल.”
सूर्यकुमार यादवची वनडेतील कामगिरी काही खास नाही. आतापर्यंत त्याने ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५ च्या सरासरीने केवळ ७७३ धावा केल्या आहेत. एकही शतक झळकावलेले नाही, फक्त ४ अर्धशतके झळकावली आहेत.
तर संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर सॅमसनने १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५६ च्या सरासरीने ५१० धावा केल्या आहेत. आकाशचा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणे बाकी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह
संबंधित बातम्या