CAN Vs IRE : न्यूयॉर्कच्या स्टेडिमयवर पहिल्यांदाच शंभरी पार, कॅनडाचे आयर्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य-can vs ire t20 world cup 2024 canada vs ireland scorecard match result ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CAN Vs IRE : न्यूयॉर्कच्या स्टेडिमयवर पहिल्यांदाच शंभरी पार, कॅनडाचे आयर्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य

CAN Vs IRE : न्यूयॉर्कच्या स्टेडिमयवर पहिल्यांदाच शंभरी पार, कॅनडाचे आयर्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य

Jun 07, 2024 11:28 PM IST

CAN Vs IRE T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १३वा सामना आयर्लंड आणि कॅनडा यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कॅनडाने २० षटकात १३७ धावा केल्या.

T20 World Cup 2024 Canada Vs Ireland Scorecard
T20 World Cup 2024 Canada Vs Ireland Scorecard (PTI)

Canada Vs Ireland Scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १३वा सामना आयर्लंड आणि कॅनडा यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

यानंतर कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १३७ धावा केल्या. पण त्याआधी कॅनडाची सुरुवात चांगली झाली नाही. कॅनडाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. 

यानंतर निकोलस आणि श्रेयस मोव्वाने पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्याच्या जोरावर कॅनडाने २० षटकांत ७ विकेट गमावून १३७ धावा करण्यात यश मिळवले. 

आयर्लंडकडून क्रेग यंग आणि बॅरी मॅकार्थीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. कॅनडाकडून निकोलस ३५ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४९ धावा करून बाद झाला, तर श्रेयसने ३६ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या.

पहिल्यांदा एखाद्या संघाने १०० धावांचा आकडा ओलांडला

दरम्यान, न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिल्यांदा एखाद्या संघाने १०० धावांचा आकडा ओलांडला आहे.

न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर २०२४ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. या मैदानावरील पहिला सामना ३ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. त्या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या श्रीलंकेचा संघ केवळ ७७ धावांवरच मर्यादित राहिला. ही एक सोपी धावसंख्या आहे असे दिसते, परंतु दक्षिण आफ्रिकेला हे लक्ष्या गाठण्यासाठी १७ षटके खेळावी लागली.

यानंतर भारत विरुद्ध आयर्लंड सामना ५ जून रोजी नासाऊ स्टेडियमवर झाला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या आयर्लंडचा संघ ९६ धावा करून सर्वबाद झाला. भारत सध्या टी-20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन संघ आहे, ९७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

याआधी या मैदानावर भारताने २० षटकात १८२ धावा केल्या होत्या. पण तो सराव सामना होता. आता आज पहिल्यांदाच अधिकृत सामन्यात एखादा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे.

Whats_app_banner