BPL 2025 : पगार न मिळाल्याने बस चालक संतापला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या किट बॅग जप्त केल्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BPL 2025 : पगार न मिळाल्याने बस चालक संतापला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या किट बॅग जप्त केल्या

BPL 2025 : पगार न मिळाल्याने बस चालक संतापला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या किट बॅग जप्त केल्या

Feb 03, 2025 04:52 PM IST

Bangladesh Premier League Fixing : बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. बस चालकाला त्याचा पगार न मिळाल्याने त्याने खेळाडूंची किट बॅग जप्त केल्या आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत किट बॅग परत करणार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

BPL 2025 : पगार न मिळाल्याने बस चालक संतापला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या किट बॅग जप्त केल्या
BPL 2025 : पगार न मिळाल्याने बस चालक संतापला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या किट बॅग जप्त केल्या

BPL 2025 Match Fixing and Corruption : बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये दररोज काही ना काही राडा होताना दिसत आहे. या लीगवर मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. या दरम्यानच, खेळाडूंना पगार मिळत नसल्याचा मुद्दाही तापला आहे. दरबार राजशाही संघाच्या खेळाडूंना अद्याप वेतन मिळालेले नाही.

पाकिस्तानचा मोहम्मद हरीस, अफगाणिस्तानचा आफताब आलम, झिम्बाब्वेचा रायन बर्ल यांसारखे खेळाडू त्यांच्या पेमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. काही खेळाडूंना २५ टक्के पगार मिळाला आहे तर काहींना अद्याप एक पैसाही देण्यात आलेला नाही.

बस चालकाने खेळाडूंच्या किटबॅग लॉक केल्या

यामध्ये आता एक नवा प्रकार समोर आला आहे. या लीगमध्ये वेतन केवळ खेळाडूंनाच मिळत नाही, असे नाही. तर संघाला एका शहरातून दुसऱ्या शहरात नेणाऱ्या बसच्या चालकालाही पैसे दिलेले नाहीत. रविवारी चालकाने खेळाडूंचे किट बसमध्येच लॉक केले. यानंतर खेळाडूसाठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. पैसे मिळेपर्यंत खेळाडूंच्या किट बॅगा देणार नसल्याचे चालकाने स्पष्ट केले.

बस ड्रायव्हर काय म्हणाला?

दरबार राजशाही संघाचा बस चालक मोहम्मद बाबुल याने टीम हॉटेलसमोर माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'ही खेदाची आणि शरमेची बाब आहे. जर त्यांनी आम्हाला पैसे दिले असते तर आम्ही खेळाडूंना किट बॅग परत केल्या असत्या. आजपर्यंत मी तोंड उघडले नव्हते. स्थानिक आणि परदेशी क्रिकेटपटूंच्या किट बॅग बसमध्ये आहेत, परंतु मी त्या देऊ शकत नाही कारण आमच्या मेहनतीचा मोठा भाग अद्याप दिलेला नाही.

जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कोणाचेही सामान परत करणार नसल्याचे बस चालकाने स्पष्ट केले आहे. 

लीगमधून बाहेर पडलेला संघ

दरबाद राजशाही संघ बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडला आहे. या हंगामात संघाने १२ सामन्यांत ६ विजय मिळवले. खुलना टायगर्सच्या नावावर केवळ ६ विजय आहेत. मात्र चांगल्या नेट रनरेटमुळे संघ बाद फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. ७ संघांच्या या लीगमध्ये दरबारचा संघ पाचव्या स्थानावर राहिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या