मराठी बातम्या  /  धर्म  /  Holi 2024 : होळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करा, या वस्तू घरात आणल्यास निश्चित धनलाभ होईल, वाचा

Holi 2024 : होळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करा, या वस्तू घरात आणल्यास निश्चित धनलाभ होईल, वाचा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 23, 2024 04:22 PM IST

Holi 2024 : आपण सर्वजण आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करत असतो. पण काही खास दिवशी या उपायांचे काळजीपूर्वक पालन केल्यास आपल्याला त्याचे दुप्पट लाभ होतात.

Holi 2024 : होळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करा, या वस्तू घरात आणल्यास निश्चित धनलाभ होईल, वाचा
Holi 2024 : होळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करा, या वस्तू घरात आणल्यास निश्चित धनलाभ होईल, वाचा (HT)

होळीचा सण यंदा २५ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. तर होलिका दहन २४ मार्च रोजी रात्री होणार आहे. होळीची मुख्य रात्र म्हणजे २५ मार्च हीदेखील पौर्णिमेची रात्र आहे, पौर्णिमा तिथी थेट देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. 

वास्तविक, आपण सर्वजण आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करत असतो. पण काही खास दिवशी या उपायांचे काळजीपूर्वक पालन केल्यास आपल्याला त्याचे दुप्पट लाभ होतात.

जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल आणि आयुष्यात अर्थिक समृद्धी हवी असेल तर वास्तूनुसार, होळीच्या दिवशी तुम्ही काही वस्तू घरात आणल्या पाहिजे. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुम्हाला खास आशिर्वाद देते. यामुळे तुमचे घर सुख-समृद्धीने भरून जाईल. तसेच तुमची आर्थिक स्थिती सदैव मजबूत राहील.

होळीच्या दिवशी घरी आणा या वस्तू

धातूपासून बनवलेले कासव- वास्तूनुसार कासवाला संपत्तीचे सूचक मानले जाते. होळीच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी घरात धातूचे कासव आणल्यास त्याचे शुभ फळ मिळते. त्याची सकारात्मक उर्जा घरातील गरिबी दूर करते आणि संपत्ती आणते. 

लक्षात ठेवा कासव हे धातूचे किंवा क्रिस्टलचे असावे, तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. हे कासव घराच्या पूर्वेकडे ठेवा.

लक्ष्मी पद्म चिन्ह - घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बंडनवार लावणे शुभ असते.तसेच होळीच्या दिवशी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या प्रतीकाचा फोटो लावावा. 

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे पद्म चिन्ह बसवा. असे केल्याने देवी लक्ष्मीचे चरण निश्चितपणे घरात पडतात. वास्तूनुसार, पैसा आकर्षित करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

तुळशीचे रोप- पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे रोप तोडण्यास मनाई आहे. पण जर तुम्ही होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुमच्या घराच्या अंगणात होळीचे रोप लावले आणि त्याची रोज पूजा केली तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे रोप तोडणे योग्य मानले जात नाही, परंतु या दिवशी ते घरामध्ये लावणे खूप शुभ आहे.

चांदीचे नाणे- चांदी ही सर्वात पवित्र धातू मानले जाते आणि ती देवी लक्ष्मीसह चंद्राशी संबंधित धातू आहे. हिंदू धर्मात गणेश-लक्ष्मीजी असलेले चांदीचे नाणे धनाच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जाते. अशा स्थितीत देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी होळीच्या दिवशी चांदीचे नाणे घरी आणून त्यावर अक्षत, गंगाजल, रोळी, फुले इत्यादी अर्पण करून त्याची स्थापना घरात करू शकता. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग