शोएब अख्तर हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. अख्तरने २००३ मध्ये ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू टाकला होता, जो क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. अख्तरने हा चेंडू टाकून २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजपर्यंत त्याचा हा विक्रम कोणीही मोडू शकले नाही.
अख्तर याच्यानंतर त्याच्यासारखा वेगवान गोलंदाज क्रिकेट जगतात आला नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोलंदाज हुबेहुब शोएब अख्तरप्रमाणे गोलंदाजी करत आहे.
विशेष म्हणजे, शोएब अख्तर याने स्वतः या गोलंदाजाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला होता. अख्तरप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचे नाव इमरान मोहम्मद असून तो ओमानमध्ये क्रिकेट खेळतो. इम्रान मुळचा पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा इथला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इमरान शोएब अख्तरप्रमाणेच रनअप घेत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच त्याची ॲक्शनही शोएब अख्तरसारखीच आहे.
दरम्यान, त्याचा रनअप आणि गोलंदाजी ॲक्शन शोएब अख्तरसारखीच आहे. पण त्याचा लुकही शोएबप्रमाणेच आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तर सारखी गोलंदाजी करणाऱ्या इम्रान मोहम्मद याने वयाच्या १८ व्या वर्षी आपला देश सोडला. आता तो ओमानची राजधानी मस्कत येथे राहतो, जिथे तो सीसीटीव्ही कॅमेरे लावून आपला उदरनिर्वाह करतो. याशिवाय तो क्रिकेटचा सरावही करत राहतो आणि ओमानमधील क्रिकेट लीगमध्ये भाग घेतो. आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे.