IND vs AUS Pink Test At SCG : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या चौथ्या कसोटीत भारताचा पराभव झाला. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान खेळला गेला. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी पराभव करून मोठा धक्का दिला.
या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा केवळ सिडनी कसोटीवर अवलंबून आहेत. हा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सिडनी कसोटीला पिंक टेस्ट असेही म्हटले जाईल.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला पिंक टेस्ट म्हटले जाईल. पिंक टेस्ट २००९ मध्ये सुरू झाली. वर्षातील पहिल्या सामन्याला पिंक टेस्ट म्हटले जाते. हा सामना लाल चेंडूने खेळला जातो.
वास्तविक, हा कसोटी सामना ग्लेन मॅकग्रा याची दिवंगत पत्नी जेन मॅकग्रा हिच्या स्मरणार्थ खेळली जाते. जेनचे २००८ मध्ये स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.
ग्लेन मॅकग्रा याने जेनच्या स्मृतीमध्ये मॅकग्रा फाऊंडेशनची स्थापना केली, जी स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करते. पिंक टेस्टचा उद्देश स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता आणि निधी उभारणे हा आहे.
गुलाबी कसोटी दरम्यान संपूर्ण स्टेडियम गुलाबी रंगाने सजणार आहे. स्टँड, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंच्या जर्सी या सर्वांवर गुलाबी रंगाची झलक दिसते. ऑस्ट्रेलियन खेळाडू विशेषतः गुलाबी रंगाच्या टोप्या घालतात आणि जर्सीवर त्यांची नावे आणि क्रमांक गुलाबी रंगात लिहिलेले असतात.
हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्वााचा आहे. कारण भारताला WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्याची ही शेवटची संधी आहे.
पण, ऑस्ट्रेलियाची सिडनीतील चमकदार कामगिरी आणि गुलाबी कसोटीची विशेष परंपरा यामुळे ऑस्ट्रेलियन संघ आणखी धोकादायक होतो. सिडनी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांसाठी खूप खास असेल. ऑस्ट्रेलियाला आपली आघाडी कायम ठेवायची आहे, तर भारताला स्वत:ला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे.
संबंधित बातम्या