Virat-Anushka Spotted Strolling in Melbourne Street : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेचा थेट संबंध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्याशी आहे. अशा स्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील आगामी दोन कसोटी सामने जिंकणे भारताला खूप आवश्यक आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.
आता २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. याआधी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत मेलबर्नच्या रस्त्यावर भटकंती करताना दिसला.
महत्त्वाच्या कसोटीपूर्वी टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली असून सराव सत्रही सुरू आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहली त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मेलबर्नच्या रस्त्यांवर फिरताना दिसला. या जोडप्याच्या आउटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पर्थ कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या सपोर्टचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, "अनुष्का नेहमीच माझ्यासोबत असते, कोणतीही परिस्थिती असो. पडद्यामागे काय होते हे तिला माहीत आहे आणि ती मला कठीण काळात मदत करते." तिचे इथे असणे माझ्यासाठी खूप खास आहे."
कोहली पुढे म्हणाला, “मला संघासाठी योगदान द्यायचे आहे आणि केवळ संघात टिकून राहण्यासाठी खेळायचे नाही.”
ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडकडून ३-० ने पराभूत झाल्यानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली. पण पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार विजयाने अंतिम फेरीच्या आशा पुन्हा जागृत केल्या. मात्र, दुसऱ्या कसोटीत १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने भारत तिसऱ्या स्थानावर घसरला.
आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील, अन्यथा त्यांचे भवितव्य इतर संघांच्या निकालावर अवलंबून असेल.
संबंधित बातम्या