अशातच आता या मालिकेपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा एक जबरदस्त प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारताचे आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाचे कौतुक केले होते.
व्हिडीओमध्ये पहिले सुनील गावसक दिसत आहेत, ज्यांनी भारताबाबत सांगितले आहे, गावस्कर म्हणाता दिसत आहेत, की तुम्हाला भारतात सर्वत्र क्रिकेट पाहायला मिळेल. तसेच, भारतात क्रिकेटला किती महत्त्व आहे हेही सांगितले. यानंतर रिकी पॉंटिंग याने ऑस्ट्रेलिया आणि तेथील क्रिकेटची माहिती दिली.
दरम्यान, गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी दोनदा ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलियाने १९ नोव्हेंबर २०२३ रोजी टीम इंडियाला धुळ चारून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याआधी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, १४ ते १८ डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.