क्रिकेटर्स आणि बॉलिवूड यांचे खूप जुने नाते आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनेकदा क्रिकेटपटूंशी लग्न करतात, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे या नात्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
अशातच, काही दिवसांपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू रियान पराग आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण आता अनन्या पांडेने विराट कोहली हा तिचा 'सेलिब्रेटी क्रश' असल्याचे म्हटले आहे. यानंतर चाहत्यांना रियान परागबद्दल दुःख झाले आहे.
एका मुलाखतीदरम्यान अनन्या पांडेला विचारण्यात आले, की तुझा सध्याचा 'सेलिब्रेटी क्रश' कोण आहे? याला प्रत्युत्तर देताना तिने लगेच विराट कोहलीचे नाव घेतले.
अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये चाहते रियान परागसाठी दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. रियान परागबाबत चाहत्यांना वाईट वाटत आहे.
काही दिवसांपूर्वीच रियान परागचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होता. या दरम्यान, रियाने काही तरी सर्च करण्यासाठी यूट्यूबचा सर्च बॉक्स ओपन केला, तेव्हा त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये 'हॉट अनन्या पांडे' आणि 'सारा अली खान हॉट' असे सर्च केल्याचे दिसून आले. यानंतर रियानची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली आणि त्याचे नाव अनन्या पांडेसोबत जोडण्यात आले.
दरम्यान, नुकतेच शुभमन गिल आणि अनन्या पांडे यांनी एकत्र एक जाहिरात शूट केली होती. त्यांच्या ॲड शूटचा फोटो व्हायरल झाला होता. यात अनन्या शुभमन गिलसोबत दिसली. हा फोटो फोटो समोर आल्यानंतरही चाहत्यांना रियान परागबाबत वाईट वाटले होते आणि त्यावेळीही चाहत्यांनी सोशल मीडियावर रियान परागबाबत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या.