Ranji Trophy : भुवी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? रणजी सामन्यात केली ५ फलंदाजांची शिकार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : भुवी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? रणजी सामन्यात केली ५ फलंदाजांची शिकार

Ranji Trophy : भुवी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? रणजी सामन्यात केली ५ फलंदाजांची शिकार

Jan 12, 2024 08:57 PM IST

Bhuvneshwar Kumar In Ranji Trophy 2024 : भुवनेश्वरकुमार उत्तर प्रदेशसाठी रणजी क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांच्यात आजपासून (१२ जानेवारी) सामना खेळला जात आहे.

Bhuvneshwar Kumar Ranji Trophy 2024
Bhuvneshwar Kumar Ranji Trophy 2024

Bhuvneshwar Kumar ranji trophy : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ५ वर्षांनंतर स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये परतला आहे. भुवनेश्वर कुमार बराच काळापासून टीम इंडियासाठी रेड बॉल क्रिकेट खेळत नव्हता. पण आता बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या भुवीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.

भुवनेश्वरकुमार उत्तर प्रदेशसाठी रणजी क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांच्यात आजपासून (१२ जानेवारी) सामना खेळला जात आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर असलेल्या या सामन्यात भुवीने दमदार कामगिरी करत ५ विकेट घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे, २५ जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेआधी भुवीने टीम इंडियाच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.

भुवीचे ५ विकेट

बंगालविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. भुवीने पहिल्या डावात १३.५ षटकात अवघ्या २५ धावा देत ५ बळी घेतले. त्याने ३ मेडन षटकेही टाकली.

मात्र, फलंदाजी युपीच्या संघाने अतिशय वाईट कामगिरी केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला उत्तर प्रदेशचा अवघ्या ६० धावांत गारद झाला. पण यानंतर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने दम दाखवत यूपीला सामन्यात परत आणले.

भुवनेश्वरकुमारने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो कसोटी सामना खेळलेला नव्हता. तर २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भुवीने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

बंगालच्या पहिल्या डावात ९५ धावा

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी पहिल्या डावात ५ गडी गमावून ९५ धावा केल्या होत्या. सौरव पॉल १३ धावा करून बाद झाला. सुदीप कुमार शुन्यावर बाद झाला. कर्णधार मनोज तिवारी ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक पोरेल १२ धावा करून बाद झाला. युपीकडून एकट्या भुवनेश्वर कुमारने ५ विकेट घेतल्या.

अशाप्रकारे बंगालने यूपीवर ३५ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. खराब प्रकाशामुळे खेळ वेळेपूर्वीच बंद झाला.

Whats_app_banner