भुवनेश्वर कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला आहे. आयपीएल २०२५ मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी RCB ने भुवीला मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त किंमतीत विकत घेतले. आरसीबीने भुवनेश्वर कुमार याला १०.७५ कोटींमध्ये खरेदी केले.
भुवीने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. भुवनेश्वर यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.
भुवनेश्वर कुमारसाठी मुंबई इंडियन्सने पहिली बोली लावली. यानंतर लखनौ सुपर जायंट्सही त्यात सामील झाले. मुंबईने १०.२५ कोटींपर्यंत भुवीसाठी बोली लावली. तर लखनौने १०.५० कोटींची शेवटची बोली लावली. पण शेवटी आरसीबीने बाजी मारली. भुवनेश्वरला १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. भुवीमुळे आरसीबीची गोलंदाजी अधिक मजबूत होईल.
भुवी याआधी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आतापर्यंत प्रत्येक मोसमात तो हैदराबादकडूनच खेळला होता. हैदराबाद त्याला २०२४ मध्ये पगार म्हणून ४.२० कोटी रुपये देत होते. पण आता त्याचा पगार दुपटीने वाढला आहे. भुवनेश्वरला आता १०.७५ कोटी रुपये मिळणार आहेत.
भुवनेश्वरने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७६ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने १८१ विकेट्स घेतल्या आहेत. भुवीची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १९ धावांत ५ बळी. भुवनेश्वरनेही दोनदा एका सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. भुवीने टीम इंडियासाठी ८७ टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ९० विकेट्स घेतल्या आहेत.
आरसीबीने जोश हेजलवूडवर खूप पैसा खर्च केला. हेजलवुड १२.५० कोटी रुपयांमध्ये आरसीबीत आला. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. जितेश शर्माची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मात्र आरसीबीने त्याला ११ कोटी रुपयांना खरेदी केले.
जितेश हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. फिलिप सॉल्ट हा यष्टिरक्षक फलंदाजही आहे. आरसीबीने त्याला ११.५० कोटी रुपयांना खरेदी केले. आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोनला ८.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.