Bhuvneshwar Kumar : स्विंग किंग भुवनेश्वर कुमारची हॅट्ट्रिक, ४ षटकात दिल्या केवळ ६ धावा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Bhuvneshwar Kumar : स्विंग किंग भुवनेश्वर कुमारची हॅट्ट्रिक, ४ षटकात दिल्या केवळ ६ धावा

Bhuvneshwar Kumar : स्विंग किंग भुवनेश्वर कुमारची हॅट्ट्रिक, ४ षटकात दिल्या केवळ ६ धावा

Dec 05, 2024 04:28 PM IST

Bhuvneshwar Kumar hat-trick In SMAT: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमार याने झारखंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. तो संघाचे नेतृत्वही करत आहे.

Bhuvneshwar Kumar : स्विंग किंग भुवनेश्वर कुमारची हॅट्ट्रिक, ४ षटकात दिल्या केवळ ६ धावा
Bhuvneshwar Kumar : स्विंग किंग भुवनेश्वर कुमारची हॅट्ट्रिक, ४ षटकात दिल्या केवळ ६ धावा

Uttar Pradesh vs Jharkhand : भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमार याने चमत्कार घडवला आहे. भुवीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. भुवनेश्वर कुमारने झारखंडविरुद्धच्या सामन्यात सलग तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.

टी-20 क्रिकेटमधली भुवीची ही पहिली हॅट्ट्रिक आहे. या हॅट्ट्रिकसह भुवनेश्वर कुमारने पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करण्याचा दावा केला आहे, पण सध्याच्या स्थितीत हे काम खूप अवघड आहे.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या कर्णधार भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली. भुवनेश्वर कुमारने १७ व्या षटकात हा पराक्रम केला. मोठी गोष्ट म्हणजे या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर भुवनेश्वर कुमारने बॅक टू बॅक विकेट्स घेतल्या आणि एकही धाव दिली नाही.

सामन्याच्या १७व्या षटकात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला तोपर्यंत झारखंडच्या संघाने ११६ धावा केल्या होत्या. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ११ धावा करणाऱ्या रॉबिन मिंजला बाद केले.

त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने शुन्यावर बाळकृष्णला बाद केले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने विवेकानंद तिवारीला बाद केले. तोही शुन्यावर बाद झाला.

यूपीकडून रिंकू सिंगने शानदार खेळी केली

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाने २० षटकात १६० धावा केल्या होत्या. संघाकडून एकही अर्धशतक झाले नाही, पण रिंकू सिंगने नक्कीच २८ चेंडूत ४५ धावांची खेळी केली.

यानंतर झारखंड संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा संपूर्ण संघ केवळ १५० धावाच करू शकला आणि बाद झाला. अशाप्रकारे उत्तर प्रदेशने हा सामना १० धावांनी जिंकला. एकेकाळी झारखंडचा संघ विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते, मात्र भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीपुढे झारखंडची गाडी रुळावरून घसरली.

आरसीबीने भुवीला १० कोटींहून अधिक किमतीत खरेदी केले

आयपीएलमध्ये जवळपास १० वर्षे SRH म्हणजेच सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा संघ यावेळी बदलला आहे. गेल्या वर्षीपर्यंत त्यांना SRH कडून ४.२० कोटी रुपये मिळत होते. मात्र यावेळी त्यांचा पगार अनेक पटींनी वाढला आहे.

जेव्हा त्याचे नाव २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत पुकारले गेले तेव्हा एमआय म्हणजेच मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली. यानंतर, एलएसजी आणि एमआय यांच्यातील चुरस बराच काळ सुरू राहिली. हळूहळू त्याच्या किमतीने १० कोटींचा टप्पा ओलांडला. यानंतर, आरसीबीने अचानक लिलावाच्या मैदानात उडी घेतली आणि १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या