Bhuvneshwar Kumar : भुवीने एकट्याने केली ८ फलंदाजांची शिकार, टीम इंडियात पुनरागमन करणार?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Bhuvneshwar Kumar : भुवीने एकट्याने केली ८ फलंदाजांची शिकार, टीम इंडियात पुनरागमन करणार?

Bhuvneshwar Kumar : भुवीने एकट्याने केली ८ फलंदाजांची शिकार, टीम इंडियात पुनरागमन करणार?

Jan 13, 2024 04:07 PM IST

Bhuvneshwar Kumar 8 Wickets in Ranji Trophy : भुवनेश्वर कुमारने बंगालविरुद्धच्या रणजी सामन्यात ८ विकेट घेत तुफानी कामगिरी केली आहे. यानंतर तो टीम इंडियात जागा मिळवतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar Kumar

Bhuvneshwar Kumar, Ranji Trophy 2023-24 : भुवनेश्वर कुमारने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. सोबतच त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. भुवनेश्वर रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळत आहे. बंगालविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भुवीने ८ विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे.

काही काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या भुवनेश्वरने आपल्या शानदार कामगिरीने पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन केले आहे.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवनेश्वरने ६ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात ८ विकेट्स घेण्याचा चमत्कार केला. भुवीने आपल्या शानदार गोलंदाजीमुळे यूपी संघाला सामन्यात परत आणले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या ६० धावांत गारद झाला. याच्या प्रत्युत्तरात बंगालचा पहिला डाव १८८ धावांत आटोपला. भुवीने २२ षटकात ४१ धावा देऊन ८ विकेट घेतल्या

भुवीशिवाय यश दयालने उर्वरित दोन विकेट घेतल्या. पहिल्या डावात १८८ धावांत सर्वबाद झाल्यानंतरही बंगालने १२८ धावांची आघाडी मिळवली आहे.

भुवी बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर

भुवनेश्वर कुमार हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. पण त्याने भारतासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये खेळला. हा सामना २०२२ टी-20 वर्ल्डकपचा सेमी फायनल सामना होता.

तर भुवीने जानेवारी २०२२ मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. तर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.

पण आता रणजी ट्रॉफीतील आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याला टीम इंडियात जागा मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भुवनेश्वरने कुमारने भारतासाठी आतापर्यंत २१ कसोटी, १२१ वनडे आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Whats_app_banner